रायगडाचे दरवाजे बंद झाले की खालून वर येईल ती फक्त हवा आणि वरुन खाली जाईल ते फक्त पाणी असे म्हटले जाते. या सर्वाला अपवाद ठरली ती म्हणजे हिरकणी. इतिहासातील पाठ्यपुस्तकातील ही हिरकणी आता भव्य दिव्य स्वरुपात मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओक निर्मीत ‘हिरकणी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘हिरकणी’ या चित्रपटात हिरकणीची भूमिका मराठी चित्रपटसृष्टीमधीस लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णी साकारण आहे. हिरकणीची निरागसता आता सादर करताना सोनालीला फार मेहनत घ्यावी लागली असल्याचे सोनालीने लोकसत्ता ऑनलइनला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले आहे. ‘मी हिरकणी या पात्रासाठी स्वत:मध्ये खूप बदल केले. कारण खऱ्याखुऱ्या आयुष्यात मी अजिबात तशी नाहीये. माझी प्रतिमा तशी नाहीये. त्यावेळी हिरकणीचे जग फार छोटे होते. त्यामुळे चुल-मुल, नवरा, संसार आणि महाराज इतकेच तिझे जग होते. त्यामुळे हिरकणीची निरागसता आता माझ्यात आणणे माझ्यासाठी आव्हानात्मक होते’ असे सोनाली कुलकर्णी म्हणाली.

elon musk postpones trip to india
‘टेस्ला’चे मस्क यांचा भारत दौरा लांबणीवर; वर्षअखेरीस भेटीचे सुतोवाच
Supriya Sule, Amol Kolhe, Ajit Pawar taunt,
खासदार डॉ. अमोल कोल्हे हे एक सुसंस्कृत लोकप्रतिनिधी – सुप्रिया सुळे
Arvind kejriwal private secretary Bibhav Kumar
केजरीवालांची सावली म्हणून ओळखले जाणारे बिभव कुमार नेमके कोण?
Ramdas Athawale, raj thackeray
“महायुतीला राज ठाकरेंच्या पाठिंब्याची गरज नव्हती, मात्र…”, रामदास आठवले यांची प्रतिक्रिया; म्हणाले…

मुलाखतीदरम्यान प्रसाद ओकने सोनालीचे कौतुक करत घेतलेल्या माहितीचा खुलासा केला. ‘तिने वर्षभर फेशिअल, थ्रेडिंग, वॅक्सिंग, मेनीक्युअर, पेडिक्युअर केलेले नाही. हिकरणीच्या काळात थ्रेडिंग वेगरे नव्हते. त्यामुळे हिकरणी या पात्राचा खरे पणा जपण्यासाठी सोनालीने वर्षभर सौंदर्य प्रसाधनांचा त्याग केला होता आणि मला असे वाटते की ही खूप मोठी गोष्ट आहे’ असा खुलासा प्रसाद ओकने केला आहे.

प्रसाद ओक दिग्दर्शित ‘हिरकणी’ चित्रपटाची निर्मिती इरादा एंटरटेनमेंटच्या फाल्गुनी पटेल आणि सहनिर्मिती लॉरेन्स डिसुझा यांनी केली आहे आणि राजेश मापुस्कर या सिनेमाचे क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहेत. कार्यकारी निर्माते म्हणून रत्नकांत जगताप यांनी काम पाहिले आहे. येत्या दिवाळीत २४ ऑक्टोबरला ‘हिरकणी’ संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.