News Flash

‘तान्हाजी’ची विक्रमी कमाई; दुसऱ्या आठवड्यात देखील हाऊसफुल

'तान्हाजी द अनसंग वॉरिअर' दुसऱ्या आठवड्यात देखील हाऊसफुल

अजय देवगन, काजोल, सैफ अली खान यांसारख्या अनेक नामांकित कलाकारांनी भरलेला ‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’ हा चित्रपट दुसऱ्या आठवड्यात देखील तिकीटबारीवर अक्षरश: धुमाकूळ घालत आहे. १० जानेवारीला प्रदर्शित झालेल्या तान्हाजीने केवळ १४ दिवसांमध्ये १९२ कोटी २८ लाख रुपयांची विक्रमी कमाई केली आहे. यातील ७८ कोटी १६ लाख रुपये या चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यात कमावले आहेत.

अवश्य पाहा – Photo : १३ किलो वजन कमी करणाऱ्या ‘फॅट’ अभिनेत्रीचा ‘फीट’ लूक

अवश्य वाचा – कंगना रनौतने घेतला विराट कोहलीशी पंगा

अवश्य वाचा – दीपिका पदुकोणने रचला इतिहास; ठरली असा विक्रम करणारी पहिली भारतीय स्त्री

गेल्या काही काळात मोठ्या प्रमाणावर चित्रपटांची निर्मिती केली जात आहे. यामुळे एकाच दिवशी दोन किंवा तीन चित्रपट देखील प्रदर्शित होताना आपण पाहत आहोत. परिणामी कुठलाही चित्रपट बाजारात एक आठवड्यापेक्षा अधिक काळ टिकत नाही. एक आठवडा झाला की लगेचच प्रेक्षकांचे लक्ष पुढल्या आठवड्यातील चित्रपटांकडे लागते. परंतु तान्हाजी त्याला अपवाद ठरत आहे. असंख्य वाद-विवाद आणि मिश्र समिक्षणानंतरही तान्हाजी दुसऱ्या आठवड्यात देखील जोरदार कमाई करताना दिसत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे हा चित्रपट ७८ कोटी १६ लाख रुपयांसह दुसऱ्या आठवड्यात सर्वाधिक कमाई करणारा आठव्या क्रमांकाचा चित्रपट ठरला आहे. तान्हाजी चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी भारतीय चित्रपट इतिहासात दुसऱ्या आठवड्यात ६० कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई करणे केवळ सातच चित्रपटांना शक्य झाले आहे. या यादीत आता ‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’ हा चित्रपट देखील सामिल झाला आहे.

दुसऱ्या आठवड्यात सर्वाधिक कमाई करणारे चित्रपट

  • बाहुबली २ : द कॉन्क्लूजन – १४३ कोटी २५ लाख

 

  • दंगल – ११५ कोटी ९६ लाख

 

  • पिके – ९५ कोटी ७८ लाख

 

  • संजू – ९२ कोटी ६७ लाख

 

  • बजरंगी भाईजान – ८७ कोटी ६७ लाख

 

  • कबिर सिंग – ७८ कोटी ७८ लाख

 

  • तान्हाजी द अनसंग वॉरिअर – ७८ कोटी १६ लाख

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2020 2:10 pm

Web Title: the ajay devgn starrer tanhaji the unsung warrior has the 8th highest second week of all times mppg 94
Next Stories
1 ‘देशी पोलिसांच्या आधी येणार विदेशी पोलीस’
2 बाळासाहेब भाषणातून गप्पा मारायचे पण राज..
3 Video: इंडियन आयडलच्या सेटवर रोहित राऊतने केले दिशा पटाणीला प्रपोज
Just Now!
X