‘ट्रान्सफॉरमर्स’च्या निर्मात्यांनी कधीच हा चित्रपट ऑस्कर पुरस्कार जिंकण्यासाठी बनविला नव्हता. ‘ट्रान्सफॉरमर्सः एज ऑफ एक्टिंक्शन’मुळे तर ते आता अधिक स्पष्ट झाले आहे. ‘ट्रान्सफॉरमर्स’च्या नव्या सिक्वलच्या अनेकांनी तक्रारी केल्या आहेत. काहींना हा चित्रपट बालिश वाटला तर काहींनी ‘ट्रान्सफॉरमर्स’ हा साजिद खान आणि राम गोपालच्या चित्रपटांपेक्षाही अधिक उणीवा असलेला, असे म्हटले आहे.