News Flash

बापलेक आमने-सामने! अभिषेकच्या ‘द बिग बुल’ला टक्कर देणार अमिताभ यांचा ‘चेहरे’

९ एप्रिल रोजी दोन्ही चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

एकाच दिवशी दोन चित्रपट प्रदर्शित होणे हे काही नवीन नाही. पण आता बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांचा ‘चेहरे’ आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चनचा ‘द बिग बुल’ चित्रपट एकाच दिवशी म्हणजे ९ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे दोघांपैकी कोणाचा चित्रपट हिट होतो हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

अमिताभ बच्चन यांचा ‘चेहरे’ हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या पूर्वी हा चित्रपट २०२०मध्ये प्रदर्शित होणार होता. परंतू करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. ‘चेहरे’ चित्रपटाचे दिग्दर्शन रुमी जाफरी यांनी केले आहे. या चित्रपटात कलाकारांची फैज पाहायला मिळणार आहे. अमिताभ आणि इम्रानसोबतच रघुबीर यादव आणि सिद्धांत कपूर देखील दिसणार आहेत. तसेच क्रिस्टल डीसूजासोबत रिया चक्रवर्ती देखील चित्रपटात दिसणार आहे.

आणखी वाचा : पुन्हा ‘scam’, अभिषेकच्या ‘The Big Bull’चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित

तर अभिषेक बच्चनचा ‘द बिग बुल’ हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात अभिषेक बच्चनसोबत इलियाना डिक्रुझ, निकिता दत्त, सुमित व्यास, राम कपूर, सोहम शाह हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात अभिषेक मुख्य भूमिकेत दिसणार असून १९९२ मध्ये भारतीय शेअर बाजारात झालेल्या मोठ्या स्कॅममधील आरोपी हर्षद महेता यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे.

आणखी वाचा : अखेर ‘चेहरे’मधील रियाचा लूक आला समोर, चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

अमिताभ बच्चन आणि अभिषेकचे चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार असल्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते. कोणता चित्रपट हिट ठरणार हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 20, 2021 5:19 pm

Web Title: the big bull vs chehre amitabh bachchan abhishek bachchan film battle avb 95
Next Stories
1 ‘त्याची आवडती पोझ आणि माझे आवडते एक्स्प्रेशन’, प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत
2 ‘मुंबई सागा’ प्रेक्षकांना चित्रपटगृहात खेचण्यात अयशस्वी, कमावले इतके कोटी
3 जेनेलियाने केली रितेशची धुलाई, व्हिडीओ शेअर करत प्रिती म्हणाली…
Just Now!
X