News Flash

प्रभासच्या चित्रपटांचे बजेट ऐकून व्हाल थक्क, बॉलिवूड कलाकारांनाही टाकले मागे

बाहुबली या चित्रपटाच्या माध्यमातून प्रभास घराघरात पोहोचला.

बॉलिवूड अभिनेता सलमान खान, अभिनेता आमिर खान आणि अभिनेता शाहरूख खान हे कलाकार त्यांच्या बिग बजेट चित्रपटांसाठी ओळखले जातात. पण या बॉलिवूड कलाकारांना आता एका दाक्षिणात्य सुपरस्टारने मागे टाकले आहे. हा सुपरस्टार दुसरा तिसका कोणी नसून अभिनेता प्रभास आहे. बाहुबली या चित्रपटाच्या माध्यमातून प्रभास घराघरात पोहोचला. प्रभासचे लाखो चाहते आहेत. या चित्रपटानंतर प्रभास चित्रपट करणार म्हणजे त्या चित्रपटाचा बजेट जास्त असणार असे म्हटले जाते.

फिल्मीबिटने दिलेल्या वृत्तानुसार, प्रभासच्या आगामी ३ चित्रपटांचा बजेट हा १००० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. त्याचा ‘राधे श्याम’ हा चित्रपट निर्मितीच्या शेवटच्या टप्प्यात आहे. हा चित्रपट २०२१ मध्ये मोठ्या पडद्यावर आपल्याला पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा बजेट २५० कोटी रुपये आहे. तर रामायणावर आधारीत असलेला ‘आदिपुरूष’ हा चित्रपट ११ ऑगस्ट २०२२ मध्ये प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असलेल्या या चित्रपटाचा बजेट हा ४५० कोटी रुपये आहे. या चित्रपटानंतर बॉलिवूडची मस्तानी अभिनेत्री दीपिका पादूकोण आणि प्रभास एका चित्रपटात काम करणार आहेत. या चित्रपटाचे बजेट ३०० कोटी रुपये आहे.

‘राधे श्याम’ या चित्रपटात प्रभास आणि अभिनेत्री पूजा हेगडे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. यात प्रभास विक्रमादित्य ही भूमिका साकारत आहे, तर पूजा प्रेरणा ही भूमिका वटविणार आहे. सध्या सर्वत्र या चित्रपटाची चर्चा सुरु असून प्रेक्षकांमध्ये प्रभासला मोठ्या पडद्यावर पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 19, 2021 3:06 pm

Web Title: the budget of the upcoming films of prabhas is more than 1000 crores dcp 98 avb 95
Next Stories
1 गणपती बाप्पा मोरया! सेटवर सुमीत राघवनने साजरा केला ‘टीम इंडिया’चा विजय
2 शूटिंगदरम्यान आलियाची प्रकृती बिघडली, करण्यात आले होते रुग्णालयात दाखल
3 करोना काळात चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मास्टर’ची बॉक्स ऑफिसवर जादू
Just Now!
X