हिंदी चित्रपट सृष्टीतील दिवंगत संगीतकार मदनमोहन यांच्या गाण्यांवरील ‘अल्टिमेट मेलडीज् ऑफ मदनमोहन’हा कार्यक्रम मुंबईसह वाशी आणि ठाणे येथे आयोजित करण्यात आला आहे. एकूण चार ठिकाणी होणारा हा कार्यक्रम स्वरगंधार आणि लोकसत्ता यांच्या संयुक्त विद्यमाने सादर होणार आहे. पहिला कार्यक्रम शनिवार २१ जून रोजी रात्री साडेआठ वाजता बोरिवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाटय़गृहात होणार आहे.
दुसरा कार्यक्रम २२ जून रोजी वाशी येथील विष्णुदास भावे नाटय़गृहात, तिसरा कार्यक्रम २८ जून रोजी ठाणे येथील डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृहात तर शेवटचा चौथा कार्यक्रम २९ जून रोजी प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़मंदिर येथे होणार आहे. तिन्ही ठिकाणच्या कार्यक्रमाची वेळ रात्री साडेआठ अशी आहे.
कार्यक्रमात मदनमोहन यांची गाणी व्हायोलिन, सतार, पियानो, मेंडोलिन, गिटार, बासरी आदी वाद्यांच्या सहाय्याने सादर केली जाणार आहेत. ऋषिकेश रानडे, सोनाली कुलकर्णी, विद्या करगीलकर हे गायक ही गाणी गाणार असून कार्यक्रमाचे निवेदन ज्येष्ठ पत्रकार अंबरिश मिश्र यांचे आहे. कार्यक्रमाचे संगीत संयोजन अविनाश चंद्रचूड यांचे आहे.
बोरिवली आणि ठाणे येथील प्रवेशिका नाटय़गृहावर उपलब्ध असून ठाणे आणि प्रभादेवी येथील कार्यक्रमाच्या प्रवेशिका २३ जूनपासून उपलब्ध होणार आहेत. अधिक माहितीसाठी मंदार कर्णिक यांच्याशी ९८२० ७५७ ४३५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.