News Flash

‘द डायरी ऑफ अ सायको’ थ्रिलर वेब सिरीज

भारतातली पहिलीच फाऊंड फुटेजवर आधारित थ्रिलर वेब सिरीज

‘द डायरी ऑफ अ सायको’ थ्रिलर वेब सिरीज

आजच्या ४जीच्या युगात, इण्टरनेट हे तरुण पिढीच्या प्रतिभांना संधी आणि व्यासपीठ उपलब्ध करून देणारे एक प्रतिभावान माध्यम ठरत आहे. गेल्या काही वर्षात मनोरंजनाची साधने मोठ्या सिनेमाच्या पडद्यावरून छोट्या टिव्हीवर आली. आता हेच मनोरंजन अजून छोट्या स्क्रीनवर म्हणजेच स्मार्टफोन्सवर उपलब्ध झाले आहे. त्यामुळेच चित्रपट निर्मितीत रस आणि टॅलेंट असणारे बरेच युवक या माध्यमाचा वापर करून कमी खर्चिक अशा शॉर्टफिल्म्स आणि वेब सिरीजमध्ये नवनवीन प्रयोग करत आहेत. या मार्गाचा अवलंब करून युवकांना कमी वेळेत त्यांची प्रतिभा जगापुढे मांडण्याची संधी मिळते.

मराठी सिनेमा क्षेत्रातही गेल्या काही वर्षांत नवनवीन बदल घडत आहेत आणि मराठी प्रेक्षकही या बदलांना उत्तम प्रतिसाद देत आहे. नवोदीत कलाकारांना घेऊन येणारा ‘सैराट’सारखा चित्रपट त्यामुळेच यशस्वी झाला. योग्य मार्गदर्शन आणि संधी यामुळेच अनोळखी चेहेरे रातोरात सुपरस्टार्स झाले. या सर्व यशाचे खरे मानकरी म्हणजे मराठी प्रेक्षकवर्ग.

या नवीन वर्षात, याच प्रेक्षकांसाठी एक आगळी वेगळी मराठी वेब सिरीज येत आहे. ८ प्रतिभावान होतकरू तरुणांनी ‘ध एम्प्टी स्पेस’ या नावाने एक युट्युब चॅनेल सुरू केले असून ‘द डायरी ऑफ अ सायको’ भारतातील पहिलीच ‘फाऊंड फुटेज’वर आधारीत थ्रिलर वेब सिरीजचा पहिला एपिसोड २६ जानेवारीला युट्युबवर प्रदर्शित होणार आहे. या आधीही फाऊंड फुटेजवर आधारीत हॉलीवूड चित्रपट पॅरानॉमल अॅक्टिव्हिटी आणि हिंदीत रागिनी एमएमएस या चित्रपटांना खूप यश मिळाले होता. मराठीत ‘फाऊंड फुटेज’वर आधारीत हा पहिलाच प्रयत्न आहे.
अलिकडेच या वेब सिरीजचे टिझर आणि ट्रेलर युट्युबवर प्रदर्शित करण्यात आले असून त्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद आणि कौतुकही होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2017 5:39 pm

Web Title: the dairy of a psycho thriller web series
Next Stories
1 शाहरुखसोबत सिनेमाचे प्रमोशन करणे हा माझा अधिकार- माहिरा खान
2 ‘व्हेंटिलेटर’चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर
3 घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयात गेलेल्या पुलकित सम्राटची छायाचित्रकाराला धक्काबुक्की
Just Now!
X