News Flash

Bhoomi Song Daag: काळजाला भिडणारे ‘दाग’

'वडील आणि मुलीच्या नात्यावर भाष्य करणारा चित्रपट'

'भूमी' हा चित्रपट २२ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

ओमंग कुमार दिग्दर्शित ‘भूमी’ चित्रपटातील ‘लग जा गले’ आणि ‘विल यू मॅरी मी’ या दोन्ही गाण्यांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. संजय दत्त आणि अदिती राव हैदरी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटातील तिसरे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले. वडील आणि मुलीच्या नात्यावर भाष्य करणारे हे गाणे डोळ्यात अश्रू आणणारे आहे. ‘दाग’ असे या गाण्याचे शीर्षक आहे.

एका घटनेनंतर या वडील आणि मुलीच्या आयुष्यात बदल होतात, संजय दत्तचे चपलांचे दुकान बंद होते, अदितीला तिच्या आयुष्यात काही स्वारस्य वाटत नाही या सर्व गोष्टी गाण्यातून मांडण्यात आले आहे. प्रिया सरैया यांच्या लेखणीतील हे गाणं सचिन आणि जिगरने संगीतबद्ध केले असून सुखविंदर सिंगने गायले आहे.

अदितीने तिच्या ट्विटर अकाऊंटवर हे गाणं शेअर करत लिहिले की, ‘तुम्ही माझी ताकद आहात. हे तुमच्यासाठी आहे बाबा!’ यासोबतच तिने संजय दत्तला टॅग केले.

वाचा : सुनील ग्रोवरला डेंग्यूची लागण, रुग्णालयात केले दाखल

या चित्रपटाबद्दल संजूबाबा एका मुलाखतीत म्हणाला की, ‘मी अशा संहितेच्या शोधात आहे, जी माझी प्रतिमा बदलू शकेल. मी काही तरी वेगळं करु इच्छितो. भूमी या चित्रपटाची कथा भावनात्मक आणि संवेदनशील आहे. यात बाप आणि मुलगी यांच्या नात्यावर भाष्य केले आहे.’ ‘भूमी’च्या माध्यमातून संजय दत्त बॉलिवूडमध्ये पुनरागमन करतोय. २२ सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2017 9:31 pm

Web Title: the emotional track featuring sanjay dutt and aditi rao hydari bhoomi song daag
Next Stories
1 मृत्यूनंतरही सुरू राहील इंदर कुमारवरील बलात्काराचा खटला
2 सुनील ग्रोवरला डेंग्यूची लागण, रुग्णालयात केले दाखल
3 आर्यनचा फोटो पोस्ट करताना गौरीला कोणाची वाटतेय भीती?
Just Now!
X