News Flash

शहीदांच्या कुटुंबीयांसाठी ‘टोटल धमाल’च्या टीमनं जमवला ५० लाखांचा निधी

बॉलिवूडही शहीदांच्या कुटुंबीयांसाठी पुढे आलं आहे.

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांसाठी देशभरातून मदतीचे हात पुढे येत आहे. बॉलिवूडही शहीदांच्या कुटुंबीयांसाठी पुढे आलं आहे. अक्षय कुमार, अमिताभ बच्चन, सलमान खान, विरेंद्र सेहवाग यांच्या मदतीनंतर आता ‘टोटल धमाल’ या चित्रपटाच्या टीमनंही शहीदांच्या कुटुंबीयांसाठी निधी गोळा केला आहे.

‘टोटल धमाल’ या चित्रपटासाठी काम करणाऱ्या अभिनेता अभिनेत्रींसह प्रत्येक छोट्या- मोठ्या व्यक्तीनं ५० लाखांची मदत जमा केली आहे. ही मदत शहीदांच्या कुटुंबीयांसाठी देण्यात येणार आहे. यापूर्वी ‘उरी’ चित्रपटाच्या टीमनं शहीदांच्या कुटुंबीयांसाठी निधी गोळा केला होता.
तर अक्षय कुमारने तब्बल सात कोटी रुपये मदतनिधी जमा केला. अक्षयने भारत के वीर. या अ‍ॅपच्या माध्यमातून मदतनिधी गोळा केला आहे. विशेष म्हणजे अक्षयने केवळ दीड दिवसांत सात कोटी रुपयांचा आर्थिक मदतनिधी जमा केला असून त्याने स्वत: या निधीमध्ये पाच कोटी रुपयांचे योगदान दिले आहे.

क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागनं हल्ल्यातील शहीद जवानांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे. १४  फेब्रुवारीला सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते. तर अनेक जवान गंभीर जखमी झाले. या हल्ल्याचा जगभरातून निषेध होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2019 12:17 pm

Web Title: the entire crew actors makers of totaldhamaal to donate 50 lakhs pulwama attack martyred families
Next Stories
1 एकल पालकत्वावरुन ट्रोल करणाऱ्यांना करणचं सडेतोड उत्तर
2 …म्हणून कार्तिकनं नाकारली १० कोटींची ऑफर
3 Photo : ‘सांड की आँख’ मध्ये पुन्हा एकदा प्रकाश झा यांचा अभिनय
Just Now!
X