‘द फॅमिली मॅन-२’ ची सध्या प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे. या शोने लोकप्रियतेचं शिखर गाठलं आहे. या शोमधील मनोज वाजपेयीसोबत प्रत्येक कलाकाला चाहत्यांनी मोठी पसंती दिलीय. या संपूर्ण वेब सीरिजमधील अनेक सीन्स चांगलेच गाजले आहेत. रोज शोसंबंधीत वेगवेगळे मीम्स तसचं कलाकांरांच्या बातम्या समोर येत आहेत.

प्रत्येक शोच्या चित्रीकरणाच्या मागे काहीना काही मजेशीर किस्से असतातच. तसाच एक किस्सा द फॅमिली मॅन’च्या चित्रीकरणाच्या वेळेस घडला होता. द फॅमिली मॅनच्या एका सीनमध्ये मनोज वाजपेयीला आणि शारिबला एका इटालियन पदार्थाचा उच्चार करायचां होता. या शोमधील श्रीकांतची भूमिका साकारणाऱ्या मनोज वायपेयीने एका मुलाखतीमध्ये हा किस्सा शेअर केलाय. तो म्हणाला,”सीरीज मध्ये एक हॅाटेलचा सीन आहे. ज्यात मला आणि जेके म्हणजेच शरिबला एका इटालियन पदार्थाचा उच्चार करायचा होता. त्या पदार्थाचे नाव ‘एग्लियो ई ओलियो’ असं असल्याने त्याचा ऊच्चार करणं तसं कठीण होतं.”

हा मजेशीर किस्सा सांगताना मनोज वाजपेयीने पुढे सांगितले की ” श्रीकांत आता एक गुप्त एजंट नसुन तो मोठा माणुस आहे. तो आता खासगी नोकरी करतो आणि मोठ्या हॅाटेलात जातो.असं दुसऱ्या सिझनच्या सुरुवातीला दाखवण्यात आलंय. अंधेरीतल्या एका रेस्टोरेंट मध्ये एक सीन शुट करताना मला ‘एग्लियो ई ओलियो’ या पदार्थाचा उच्चार करायचा होता. मात्र या पदार्थाचा उच्चार करता करता नाकी नऊ आले. अखेर तो सीन उत्तमरित्या शूट झाला”. हा मजेशीर किस्सा मनोज वायपेयीने शेअर केलाय.

हे देखील वाच: मड बाथसाठी मोजले तब्बल २० हजार, उर्वशी रौतेलाच्या ‘त्या’ फोटोवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

हे देखील वाचा: ‘पवित्र रिश्ता-२’मध्ये अंकिता लोखंडेसोबत ‘हा’ अभिनेता झळकणार मानवच्या भूमिकेत

‘द फॅमिली मॅन’च्या दुसऱ्या सिझनच्या यशा नंतर आता ‘द फॅमिली मॅन’च्या तिसऱ्या पर्वात काय घडणार याची लोकांना उत्सुकता लागली आहे. निर्मात्यांच्या वक्तव्या नुसार येणारे पर्व फॅन्ससाठी एखाद्दा टाइम बॉम्ब ठरणार असून नव्या सिझनमध्ये श्रीकांतचा प्रवास खूप खडतर होणार असल्याचे निर्मात्यांनी सांगितले.