News Flash

द फॅमिली मॅन 2 : ‘समांथाने दिलेले ते इंटिमेट सीन्स नंतर डिलीट करण्यात आले’

सीरिजमध्ये निगेटिव्ह भूमिका 'साजिद' साकारणारा अभिनेता शहाब अलीने केला खुलासा

या सीरिजच्या माध्यमातून दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा अक्किनेनी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले

अतिशय लोकप्रिय ठरलेल्या वेब सीरिजपैकी एक सीरिज म्हणजे ‘द फॅमिली मॅन.’ काही दिवसांपूर्वीच या सीरिजचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सीरिजच्या माध्यमातून दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा अक्किनेनी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले. या सीरिमध्ये तिने ‘राजी’ हे पात्र साकारले होते. आता या सीरिजमध्ये निगेटिव्ह भूमिका ‘साजिद’ साकारणारा अभिनेता शहाब अलीने समांथासोबत इंटिमेट सीन्स दिले होते असा खुलासा केला आहे. पण एडिट करताना ते सीन्स हटवल्याचे त्याने म्हटले आहे.

शहाबने नुकताच ‘बॉलिवूड हंगामा’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने सीरिजमध्ये समांथासोबत बोल्ड सीन्स दिले असल्याचा खुलासा केला. ‘फक्त इंटिमेट सीन्स हे एडिट केले जात नाहीत तर ती एक प्रोसेस आहे. सीरिज ही मोठी आहे त्यामुळे ती नंतर एडिट केली जाते. असे नाही की कोणता एखादा विशिष्ट सीन एडिट केला आहे’ असे शहाब म्हणाला.

आणखी वाचा : ‘द फॅमिली मॅन २’ ला प्रेक्षकांची पसंती; मनोज वाजपेयी आणि समंथाच्या अभिनयाचं कौतुक

 

View this post on Instagram

 

A post shared by Shahab Ali (@shahab.thespian)

पुढे शहाबला सीरिजमधील इंटिमेट सीन विषयी प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देत तो म्हणाला, ‘सीरिजमधील काही सीन्स असे होते ज्यामध्ये मी आणि समांथा एकमेकांच्या प्रेमात असल्याचे भासत होते. त्यावेळी काही इंटिमेट सीन्स देण्यात आले होते. पण निर्मात्यांना सीरिजमध्ये त्या सीन्सची गरज वाटली नाही. त्यामुळे त्यांनी सामांथाने दिलेले ते इंटिमेट सीन्स नंतर डिलीट केले. यामध्ये काही नवीन नाही.’

‘द फॅमिली मॅन’ ही सीरिज ४ जून रोजी प्रदर्शित होणार होती. मात्र चाहत्यांमधील उत्सुकता पाहाता निर्मात्यांनी सीरिज चक्क दोन तास आधी प्रदर्शित केली. सीरिज लवकर प्रदर्शित केल्यामुळे चाहत्यांनी ट्विटरद्वारे आनंद व्यक्त केला होता. सीरिजमध्ये मनोज वाजपेयी आणि समंथासोबत प्रियामणि, शारिब हाशमी, सीमा बिस्वा, दर्शन कुमार, शरद केळकर, सनी हिंदुजा, श्रेया धन्वंतरी, शहाब अली, वेदांत सिन्हा आणि महक ठाकूर या कलाकारांनी महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 25, 2021 9:50 am

Web Title: the family man 2 intimate scenes with samantha were deleted said by shahab ali avb 95
Next Stories
1 भरदिवसा अभिनेत्याच्या कारमधून झाली चोरी
2 करिश्माला पतीने केला होता विकण्याचा प्रयत्न
3 जेव्हा मुलाने आत्महत्या केली तेव्हा कोलमडून गेलो होतो…; कबीर बेदींनी व्यक्त केलं दुःख
Just Now!
X