News Flash

‘द फॅमिली मॅन’मधील सुचीचं खऱ्या आयुष्यातील लग्न ही वादात!

प्रियामणीने २०१७ मध्ये मुस्तफाशी लग्न केले. मात्र, आता त्याच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीने हे लग्न 'बेकायदेशीर' असल्याचा दावा केला आहे.

प्रियामणिने २०१७ मध्ये मुस्तफाशी लग्न केले.

‘द फॅमिली मॅन’ची सुचि आणि दाक्षिणात्य अभिनेत्री प्रियामणी तिच्या लग्नामुळे चर्चेत आली आहे. प्रियामणीने २०१७ मध्ये मुस्तफा राजशी लग्न केले. आता मुस्तफाची पूर्वाश्रमीची पत्नी आयशाने प्रियामणी आणि मुस्तफा यांच्या लग्ना विरोधात कोर्टाचा दरवाज ठोठावला आहे. आयशाने दावा केला आहे की मुस्तफा आणि प्रियामणी यांचे लग्न ‘बेकायदेशीर’ आहे. कारण ती मुस्तफाची पहिली पत्नी आहे, सोबतच तिचा आणि मुस्तफाचा अद्याप कायदेशीररित्या घटस्फोट झालेला नाही, असा दावा आयशाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केला आहे.

मुस्तफा आणि आयशा यांना दोन मुले आहेत. आयशाने मुस्तफाविरोधात घटस्फोट तसेच घरगुती हिंसाचाराच्या गंभीर आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. आयशाने नुकतीच ‘ईटाइम्स’ला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत या संपूर्ण प्रकरणा विषयी विचारण्यात आले होते. “मुस्तफा अजुनही कायदेशीररित्या माझा पती आहे. मुस्तफा आणि प्रियामणी यांचे लग्न बेकायदेशीर आहे. जेव्हा त्याने प्रियामणीशी लग्न केले तेव्हा आम्ही घटस्फोटासा अर्जदेखील केला नव्हता. तो अविवाहित आहे असे त्याने न्यायालयात सांगितले होते,” असे आयशा म्हणाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Priya Mani Raj (@pillumani)

आणखी वाचा : “ए आर रहमान कोण आहे?, ‘भारतरत्न’ माझ्या वडिलांच्या पायाच्या नखाच्या बरोबरीचा”

तर यावर मुस्तफा म्हणाला, “माझ्यावर लावलेले हे सर्व आरोप खोटे आहेत. मुलांचा सांभाळ करण्यासाठी मी नियमितपणे आयशाला पैसे देत असतो. तिला फक्त माझ्याकडून पैसे पाहिजे. माझं आणि प्रियामणीचं लग्न २०१७ मध्ये झालं. तर, आयशा इतके दिवस गप्प का होती?”

आणखी वाचा : गर्भवती असल्याच्या चर्चांवर सोनम कपूरने सोडलं मौन

मुस्तफाच्या बोलण्यावर आयशा म्हणाली, “दोन मुलांची आई असल्यामुळे आपण काय करू शकतो? आपल्याला शांततेत तोडगा काढायचा असतो, परंतु जेव्हा गोष्टी हाताबाहेर जातात तेव्हा आपण पुढे येतो, कारण मला हे सगळं गमवायचं नव्हतं. याकारणामुळे मी गप्प होती आणि आता मी गप्प बसली याचा फायदा घेतला जात आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2021 4:57 pm

Web Title: the family man fame actress priyamani marriage with mustafa raj is illegal claims his first wife ayesha dcp 98
टॅग : Entertainment News
Next Stories
1 मान्यता दत्तच्या वाढदिवशी संजय दत्तने शेअर केला रोमॅण्टिक व्हिडीओ; म्हणाला, ‘मेरी दुनिया है तुझमें..’
2 अनुराग कश्यपवर झालेल्या आरोपांवर मुलगी आलियाने सोडलं मौन, म्हणाली…
3 ‘सिटी ऑफ ड्रिम्स २’चा ट्रेलर प्रदर्शित, पाहायला मिळणार सत्तेसाठी बाप-मुलीत सुरु असणारा लढा
Just Now!
X