अभिनेता मनोज वाजपेयी याची प्रमुख भूमिका असलेली ‘द फॅमिली मॅन’ ही वेब सीरिज चर्चेत आहे. या सीरिजचा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी ‘द फॅमिली मॅन २’ या सीरिजचा टीझर प्रदर्शित झाला होता. टीझर पाहाता चाहत्यांमध्ये सीरिजविषयी उत्सुकता वाढल्याचे पाहायला मिळते. या सीरिजमध्ये दाक्षिणात्या सुपरस्टार नागार्जुनची सून समांथा अक्किनेनी देखील दिसणार आहे.
‘द फॅमिली मॅन २’ या वेब सीरिजमध्ये समांथा महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. पण ती कोणत्या भूमिकेत दिसणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या सीरिजच्या माध्यमातून समांथा हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करणार आहे. त्यामुळे तिला सीरिजमध्ये पाहण्यासाठी चाहते फार उत्सुक आहेत.
View this post on Instagram
काही दिवसांपूर्वी ‘द फॅमिली मॅन २’ या सीरिजच्या एक मिनिट सहा सेकंदाचा टीझर प्रदर्शित झाला होता. टीझरमध्ये श्रीकांत म्हणजे मनोज वाजपेयीच्या लाइफमध्ये समस्या असल्याचे पाहायला मिळते. तसेच सर्वजण तो गायब असल्याचे बोलताना दिसत होते. टीझरच्या शेवटी मनोज वाजपेयीची झलक पाहायला मिळाली होती.
‘द फॅमेली मॅन 2’ ही सीरिज १२ फेब्रुवारी २०२१ मध्ये अॅमेझॉन प्राइमवर या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. मनोज वाजपेयी आणि समंथासोबत प्रियामणि, शारिब हाशमी, सीमा बिस्वा, दर्शन कुमार, शरद केळकर, सनी हिंदुजा, श्रेया धन्वंतरी, शहाब अली, वेदांत सिन्हा आणि महक ठाकूर हे कलाकार महत्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 21, 2021 5:17 pm