‘द फ्लॅश’ ही सुपरहिरो वेब सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्मवर सध्या विशेष चर्चेत आहे. या सीरिजमध्ये मुख्य व्यक्तिरेखा साकारणाऱ्या १६ वर्षीय लोगन विलियम्सचे निधन झाले आहे. त्याच्या निधनामागचे कारण अद्याप कळलेले नाही. अभिनेता ग्रँट गस्टिन याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहून ही दु:खद बातमी दिली.

 

Shekhar Suman says Kangana Ranaut Adhyayan were happy together
“कंगना रणौत व माझा मुलगा एकत्र आनंदी होते,” अभिनेत्रीच्या एक्स बॉयफ्रेंडच्या वडिलांचं विधान; म्हणाले, “त्या दोघांच्याही…”
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’
mohena kumari welcomes baby girl
प्रसिद्ध अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पाच वर्षांपूर्वी अभिनय सोडून मंत्र्याच्या मुलाशी केलंय लग्न
Actor Daniel Balaji passes away
प्रसिद्ध अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, उपचारादरम्यान मालवली प्राणज्योत
View this post on Instagram

 

Just hearing the devastating news that Logan Williams has passed away suddenly. This picture was early in the filming of The Flash pilot episode back in 2014. I was so impressed by not only Logan’s talent but his professionalism on set. My thoughts and prayers will be with him and his family during what is I’m sure an unimaginably difficult time for them. Please keep Logan and his family in your thoughts and prayers during what has been a strange and trying time for us all. Sending love to everyone.

A post shared by Grant Gustin (@grantgust) on

लोगन हॉलिवूड मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता होता. त्याने ‘व्हेन कॉल्स द हार्ट’, ‘द व्हिस्पर’, ‘सुपरनॅचरल’ यांसारख्या लोकप्रिय वेब शोमध्ये काम केले होते. परंतु त्याला खरी लोकप्रियता मिळाली ती ‘द फ्लॅश’ या सुपरहिरो वेब सीरिजमुळे. या सीरिजमध्ये तो बॅरी अॅलनच्या लहानपणाची भूमिका साकारत होता. त्याचा अभिनय पाहून मेरिल स्ट्रीप, जॉनी डेप, विल स्मिथ यांसारख्या अनेक नामांकित कलाकारांची त्याची स्तुती केली होती. त्याच्या अचानक झालेल्या निधनामुळे हॉलिवूड कलासृष्टीत शोककळा पसरली आहे. लोगनचे चाहते सोशल मीडियावरुन श्रद्धांजली अर्पण करत आहेत.