News Flash

कुस्तीगीर खली जखमी

तपासणी आणि उपचारांसाठी डेहराडूनमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

द ग्रेट खली

डब्लूडब्लूईतील माजी कुस्तीपटू द ग्रेट खली म्हणजेच दलिप सिंग राणा उत्तराखंडमधील हलदवणी येथे काँटिनेंटल रेस्टलिंग एन्टरटेन्मेंट शो दरम्यान गंभीर जखमी झाला. द ग्रेट खली रिटर्न्‍स मालिकेदरम्यान माइक नॉक्स आणि ब्रॉडी स्टिल यांच्याबरोबर खलीची हलदवणी येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये लढत होती. त्या वेळी खलीच्या डोक्याला आणि छातीला मार लागला. त्याला तपासणी आणि उपचारांसाठी डेहराडूनमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्या दुखापतींचे स्वरूप अद्याप स्पष्ट झाले नसून अधिक तपासणीनंतर ते स्पष्ट होईल असे डॉक्टरांनी सांगितले. डेहराडूनला हलवण्यापूर्वी त्याच्या डोक्याला सात टाके घालण्यात आले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2016 3:26 am

Web Title: the great khali suffers severe head injuries during fight hospitalized
Next Stories
1 ऑस्कर : आडाख्यांना तडाख्याचे वर्ष!
2 फेस्टिव्हलमध्ये महिलाराज…
3 आठवणींची पिगी बँक
Just Now!
X