08 March 2021

News Flash

बॉबी देओलच्या मुलावर नेटकरी फिदा

बॉबीने शेअर केलेला फोटो सध्या नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

बॉबी देओल आणि त्याचा मुलगा आर्यमान

‘हमराज’, ‘गुप्त’, ‘सोल्जर’ यांसारख्या चित्रपटांमधून आपली छाप सोडणारा अभिनेता बॉबी देओलने नुकताच त्याचा ५०वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवशी बॉबीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला जो सध्या नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. बॉबीने त्याच्या मुलासोबतचा शेअर केलेला हा फोटो आहे.

‘४९ वर्षांचा प्रवास अप्रतिम होता. ५० वं वर्ष याहूनही चांगलं असेल. तुम्हा सर्वांच्या शुभेच्छांसाठी आभार. माझ्या मुलाने माझ्यात मित्र शोधला आहे. पुढचं सर्व आयुष्य असंच तुम्हा सर्वांसमोबत जाईल अशी आशा करतो,’ असं कॅप्शन देत बॉबीने १७ वर्षीय आर्यमानसोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोवर सध्या लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

आर्यमान नेटकऱ्यांना इतका आवडला आहे की अनेकांनी त्याला बॉलिवूड पदार्पणाचा सल्ला दिला आहे. काहींनी तर मुलासोबत ‘सोल्जर २’ चित्रपट बनव असंही कमेंट्समध्ये म्हटलंय. आर्यमानने रुपेरी पडद्यावर यावं अशी इच्छा अनेकांनी बोलून दाखवली आहे. आता चाहत्यांची ही इच्छा पूर्ण होणार का हे येत्या काळात स्पष्ट होईलच.

वाचा : रवी किशनच्या मुलीचं पद्मिनी कोल्हापुरेच्या मुलासोबत बॉलिवूड पदार्पण 

बॉबीच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाल्यास तो सलमान खानच्या आगामी ‘भारत’मध्ये झळकणार आहे. या चित्रपटासाठी बॉबीने चांगलीच कंबर कसली असून सध्या तो जिममध्ये घाम गाळताना दिसत आहे. बॉबीने त्याच्या कारकीर्दीची सुरुवात ‘बरसात’ या चित्रपटामधून केली होती. या चित्रपटामध्ये बॉबीने अभिनेत्री ट्विंकल खन्नाबरोबर स्क्रिन शेअर केली होती. त्यानंतर चित्रपटसृष्टीत सक्रिय झालेल्या बॉबीचे केवळ तीनच चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करु शकले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2019 4:31 pm

Web Title: the internet is crushing on bobby deol son aryaman
Next Stories
1 निर्भया बलात्कार प्रकरणावर नेटफ्लिक्सवर वेब सीरिज
2 अनिल कपूर ‘या’ आजाराने त्रस्त, उपचारासाठी जाणार परदेशात
3 राजकीय पक्षांच्या भूलथापांना बळी पडू नका – विक्रम गोखले
Just Now!
X