९०च्या दशकात सर्वात जास्त गाजलेली कार्टून मालिका म्हणजे ‘जंगल बुक’ (द अ‍ॅडव्हेंचर ऑफ मोगली). ही मालिका ५२ भागांची होती. दर रविवारी ही मालिका लागायची. त्या वेळी कार्टून व इतर मालिकांचा रतीब घातला जात नसे. म्हणून भारतात १९८९ मध्ये प्रसिद्ध झालेले जंगल बुक १९९४ पर्यंत चालू राहिले. पण आता पुन्हा ‘जंगल जंगल बात चली है’ हे गाणे कानावर पडणार आहे. प्रेक्षकांच्या मागणीवरुन दूरदर्शनने ‘जंगल बुक’ ही मालिका पुन्हा दाखवण्याचा निर्णय घेतला आहे.

‘जंगल बुक’ या कार्टून मालिकाने ९०च्या दशकात लहान मुलांसोबत मोठ्यांवर देखील जादू केली होती. या मालिकेने जणू काही तिचा वेगळा प्रेक्षक वर्ग निर्माण केला होता. आता हिच मालिका दूरदर्शनवर पुन्हा प्रदर्शित होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. याची माहिती दूरदर्शनने ट्विटरद्वारे दिली आहे. ‘तुमचा आवडता शो जंगल बुक ८ एप्रिल पासून दुपारी १ वाजता दूरदर्शनवर प्रदर्शित होणार आहे’ असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Nilesh sable said chala hawa yeu dya will come back soon dvr
‘चला हवा येऊ द्या’ येणार पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला? निलेश साबळे खुलासा करत म्हणाला, “त्या टीममध्ये सागर कारंडे…”
colors marathi this serial will go off air
‘कलर्स मराठी’वरील ‘ही’ लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप! कलाकार भावुक, २ वर्षे गाजवलं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य
Bijay Anand on Maidaan vs Bade Miyan Chote Miyan clash
सोनाली खरे तिची लेक अन् पती, तिघांचे दोन सिनेमे एकापाठोपाठ प्रेक्षकांच्या भेटीला; बिजय त्यांच्या चित्रपटाबद्दल म्हणाले…
Ravindra Jadeja Teases chepauk Crowd by Going For Batting Before MS Dhoni
IPL 2024: चेपॉकच्या मैदानावर जडेजाने घेतली चाहत्यांची फिरकी, धोनी आधी फलंदाजीला उतरला अन्… VIDEO होतोय व्हायरल

दूरदर्शनने हे ट्विट करताच अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने तर मला माझे बालपण आठवले असे म्हटले आहे. आता पुन्हा एकदा ‘मोगली’, ‘बगिरा’ आणि ‘शेरखान’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्यामुळे सर्वजण उत्सुक आहेत.

लॉकडाउनच्या काळात सोशल मीडियावर दूरदर्शन वाहिनीवरील लोकप्रिय मालिका पुन्हा दाखवा अशी मागणी करण्यात आली होती. प्रशासनाने प्रेक्षकांच्या मागणीनुसार ‘रामायण’, ‘महाभारत’, ‘शक्तिमान’, ‘ब्योमकेश बक्षी’, ‘सर्कस’, ‘फौजी’, ‘श्रीमान श्रीमती’ या मालिका पुन्हा दाखवण्यास सुरुवात केली. पण सर्वांना मोगलीची आठवण येत होती. आता दूरदर्शनने प्रेक्षकांची ती मागणी देखील पूर्ण केली आहे. दूरदर्शन वाहिनीसोबतच इतर वाहिन्यांनी जुने लोकप्रिय कार्यक्रम दाखवण्यास सुरुवात केली आहे. ‘साराभाई वर्सेस साराभाई’ आणि ‘खिचडी’ या दोन कॉमेडी मालिका देखील ६ एप्रिल पासून स्टार भारत वाहिनीवर सुरु झाल्या आहेत. साराभाई वर्सेस साराभाई दररोज सकाळी १० वाजता तर ११ वाजता खिचडी मालिका पुन्हा प्रदर्शित करण्यात आली आहे.