‘द कपिल शर्मा शो’ पुन्हा एकदा टीव्हीवर एन्ट्री करण्यासाठी सज्ज झालाय. पुन्हा एकदा प्रेक्षकांना हसवण्यासाठी हा शो भेटीला येतोय. याचे नवे प्रोमोज आणि व्हिडीओज देखील रिलीज करण्यात येत आहेत. ‘द कपिल शर्मा शो’ची एक नवी अपडेट समोर येतेय. यंदाच्या सीजनचा पहिला पाहुणा बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमार असणार आहे.

‘द कपिल शर्मा शो’चा तिसरा सीजन येत्या येत्या ऑगस्टपासून सुरू होणारेय. याच दरम्यार ‘खिलाडी’ अभिनेता अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’ हा चित्रपट सुद्धा रिलीज होणार आहे. त्यामुळे ‘द कपिल शर्मा शो’च्या तिसऱ्या सीजनमध्ये पहिला पाहुणा हा अभिनेता अक्षय कुमार दिसून येणार आहे. अभिनेता अक्षय कुमारचं या शोमध्ये येणं हे काही नवीन नाही. यापूर्वी अनेकदा तो या शोमध्ये दिसलेला आहे. पण अक्षय कुमार आल्यानंतर मात्र कपिल शर्मा शो एंटरटेनमेंटचा ओवरडोज बनत असतो. दुसरीकडे फॅन्स सुद्धा आपल्या अभिनेत्याला हसताना पाहून आनंदीत होत असतात.

नुकताच ‘द कपिल शर्मा शो’चा नवा प्रोमो रिलीज करण्यात आलाय. या प्रोमोमधली सगळ्यात आनंदाची बातमी म्हणजे अर्चना पूरण सिंहची सुद्धा या शोमध्ये एन्ट्री झालीय. यंदा कपिल शर्मा पुन्हा एकदा आपल्या सेंस ऑफ ह्यूमरने अर्चनासोबत कॉमेडी करताना दिसून आला. सोनी चॅनलवर ‘इंडियन आयडल’ शो च्या ऐवजी ‘द कपिल शर्मा शो’ रिप्लेस करण्यात येईल, असं देखील बोललं जातंय. मात्र याबाबत अद्याप तरी कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही.

अभिनेता अक्षय कुमारच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर त्याचे अनेक चित्रपट हे रिलीजच्या प्रतिक्षेत आहेत. त्याचा ‘सूर्यवंशी’ चित्रपट रिलीजसाठी सज्ज झालाय. नुकतंच त्याने मुंबईत ‘रक्षाबंधन’ चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलंय. त्याच्या ‘बेल बॉटम’ चित्रपट ट्रेलर सुद्धा आज रिलीज झालाय. याशिवाय तो ‘अतरंगी रे’, ‘राम सेतु’, ‘पृथ्वीराज चौहान आणि ‘बच्चन पांडे’ सारखे चित्रपट भेटीला येणार आहेत.