News Flash

“मी अजून ही सुनील ग्रोव्हरच्या संपर्कात आहे” ; ‘द कपिल शर्मा’ शोमधील अभिनेत्रीचा खुलासा

एका मुलाखतीत तिने सुनील बरोबर असलेल्या बॉन्ड आणि शो मधील तिच्या नवीन भूमिके बद्दल सांगितलं आहे.

sunil-grover
(Photo-Loksatta File Images)

अभिनेत्री रोशेल रावला ‘द कपिल शर्मा शो’ या शो मधून प्रसिद्ध मिळाली. यात तिने सुनील ग्रोव्हरच लोकप्रिय पात्र डॉक्टर मशूर गुलाटीच्या नर्सची भूमिका साकारली होती. नंतर तिने हा शो सोडला. रोशेल सध्या तिच्या आगामी वेब सीरिजसाठी काम करत असून तिने पुन्हा टीव्हीवर वापसी केली आहे. रोशेल पुन्हा ‘द कपिल शर्मा शो’च्या नवीन सिझनमध्ये लॉटरी हे पात्र साकारतान दिसत आहे. तिने कॉस्टर सुनील ग्रोव्हरशी असलेल्या बॉन्ड बद्दल एका मुलाखतीत सांगितलं आहे.

‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’मध्ये सुनील ग्रोव्हरने ‘गुत्थी, डॉक्टर मशूर गुलाटी आणि रिंकु भाभी’च्या भूमिकेतुन सर्वांना हसवला होतं. कॉमेडी टाइमिंगमुळे त्याने लाखो प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. मात्र सुनील ग्रोव्हरने कपिल शर्माशी सुरूअसलेल्या वादामुळे बऱ्याच वर्षांपूर्वी ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’या शोचा निरोप घेतला होता. एका मुलाखतीत रोशेलला तिच्या लॉटरी या नवीन पात्रा बद्दल आणि तिचा सुनील ग्रोव्हरशी संपर्कात आहे का? याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. या विषयी बोलत असताना तिने सांगिलं, “कपिल शर्मामध्ये तुम्हाला सतत वेगवेगळ्या भूमिका साकारायला मिळतात. कधी गायक तर कधी वकिल. त्यामुळ लॉटरीची भूमिका सकारताना मला खुप आनंद होतं आहे आणि यावेळेस लॉटरीच स्वप्न बदलं  असून तिला आता वकिल व्हायची इच्छा झाली आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Rochelle Rao Sequeira (@rochellerao)

सुनील ग्रोव्हर विषयी बोलताना रोशेल म्हणाली, “सुनीलच्या संपर्कात राहणायच्या बाबतीत बोलायचं झालं तर मला वाटतं की मी इतर सह-कलाकार किंवा इंडस्ट्रीमधी इतर मित्रांप्रमाणे त्याच्या संपर्कात आहे. आम्ही नेहमीच एकमेकांच्या कामाचे कौतुक करत असतो, कामाची दाखल घेत असतो. सुनील ग्रोव्हर कपिल शर्मा शो मध्ये परत यावा ही माझी देखील इच्छा आहे परंतु आता तो जे काही काम करत आहे ते तो उत्तम करत आहे आणि मी सुनीलला त्यासाठी शुभेच्छा देते”. दरम्यान सुनील ग्रोव्हरची वेब सीरिज ‘सनफ्लाॅवर’ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 2, 2021 11:07 am

Web Title: the kapil sharma show fame actress roshel rao talks about her bond with sunil grover aad 97
Next Stories
1 Video: ‘आतापर्यंत चित्रपट केले बॉलिवूडसाठी…’, माधुरी दीक्षितने घेतलेला खास उखाणा ऐकलात का?
2 “एकतर ब्रा दाखव किंवा जॅकेट तरी”; क्रॉप टॉपमुळे ‘बिग बॉस ओटीटी’ स्पर्धक उर्फी जावेद ट्रोल
3 तालिबानचे समर्थन करणाऱ्या मुस्लिमांना नसीरुद्दीन शाह यांनी झापलं, म्हणाले…
Just Now!
X