News Flash

‘द कपिल शर्मा’ शोमधील अभिनेत्रीने केला साखरपुडा

सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली माहिती..

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय कॉमेडी शो म्हणजे ‘द कपिल शर्मा शो.’ या शोमध्ये काम करणारी अभिनेत्री सुगंधा मिश्रा आणि संकेत भोसलेचा नुकताच साखरपुडा झाला आहे. दोघांनीही सोशल मीडियावर फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

सुगंधाने होणारा पती संकेत भोसलेसोबतचा फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये दोघेही रोमँटिक अंदाजात दिसत आहेत. हा फोटो शेअर करत तिने अंगठीचा इमोजी वापरला असून फोटो संकेतला टॅग केला आहे. त्यामुळे त्या दोघांचा साखरपुडा झाल्याचे समोर आले. चाहत्यांनी तिच्या या पोस्टवर कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

आणखी वाचा : ‘का अभिषेकची खोटी प्रशंसा करता?’, अमिताभ बच्चन झाले ट्रोल

 

View this post on Instagram

 

A post shared by (@sugandhamishra23)

संकेतने देखील त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सुगंधासोबतचा फोटो शेअर केला आहे. त्याच्या या पोस्टवर बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर, टोनी कक्कर, आकृती शर्मा अशा अनेक कलाकारांनी कमेंट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by (@drrrsanket)

सुगंधा आणि संकेत अनेकदा एकत्र फिरताना, डिनर डेटला जाताना दिसले होते. पण त्यांनी कधीही त्यांच्या नात्यावर उघडपणे वक्तव्य केले नव्हते. आता त्यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे साखरपुडा झाल्याचे सांगितले आहे. चाहत्यांनी त्यांच्या पोस्टवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 17, 2021 4:22 pm

Web Title: the kapil sharma show fame sugandha mishra sanket bhosale get enagaged avb 95
Next Stories
1 करण जोहरच्या ‘दोस्ताना-2’मध्ये कार्तिक आर्यनच्या जागी ‘या’ अभिनेत्यांची एण्ट्री
2 ‘सुशांतसारखे कार्तिकलाही आत्महत्येस…’, कंगनाचे ट्वीट चर्चेत
3 ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील दीपाला डान्सचे डोहाळे, गरोदरपणातही करतेय डान्स
Just Now!
X