प्रेक्षकांचा आवडता ‘द कपिल शर्मा शो’ पुन्हा एकदा प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज झालाय. पुढच्या महिन्यातच हा शो ऑन-एअर करण्यात येणार आहे. या शोसाठी आतापासूनच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. या शोमधील कलाकार सुद्धा आपआपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक अपडेट शेअर करत असतात. यंदा या शोमध्ये काही बदल करण्यात येणार आहेत. शोमध्ये आता सुदेश लहरी सुद्धा सामील झाले आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी प्रेक्षकांमध्ये एक वेगळीच क्रेझ दिसून येतेय. नुकतंच या ‘द कपिल शर्मा शो’चा पहिला टीझर रिलीज करण्यात आलाय.

‘द कपिल शर्मा शो’ ऑन-एअर होण्यापूर्वी चॅनलने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शो चा पहिला टीझर आउट केलाय. या शोमधील होस्ट कपिल शर्माने सुद्धा हा टीझर शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये कलाकार प्रेक्षक बनून या शोसाठीची आपली सीट कन्फर्म करताना दिसून येतेय. तसंच शो पुन्हा सुरू होणार असल्याचा त्यांचा आनंद देखील स्पष्टपणे झळकून येतोय. त्यानंतर कपिल शर्माची एन्ट्री होते आणि म्हणतो, “आपल्या सर्वांची सीट कन्फर्म झाली आहे…आम्ही सर्वांनी करोनाच्या दोन्ही लसी घेतल्या आहेत…आता तुम्ही सुद्धा करोनाची लसी घ्या आणि आमच्या शोमध्ये आपली सीट कन्फर्म करा..”

कपिल शर्माच्या संपूर्ण टीमने घेतली करोना लस

शो चा पहिला टीझर शेअर करताना त्यांनी लिहिलं की, “#thekapilsharmashow चा नवा सीजन लवकच भेटीला येतोय…अधिक माहितीसाठी तुम्ही @sonytvofficial शी संपर्कात रहा…#tkss #happiness.” चॅनलने शो चा पहिला टीझर आउट केल्यानंतर कपिल शर्मासह इतर कलाकारांनी सुद्धा हा टीझर त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केलाय. हे सर्व कलाकार पुन्हा आपल्या जुन्या टीम मेंबर्ससोबत काम करण्यासाठी उत्सुक झालेले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma)

 

ऑगस्टपासून सुरू होणार शो

‘द कपिल शर्मा शो’ सोनी टीव्हीवर ऑन-एअर होणार आहे. येत्या ऑगस्टपासून हा शो सुरू होणार आहे. फॅन्स सुद्धा अनेक दिवसांपासून या शो साठी प्रतिक्षेत होते. पण या शोमध्ये पुन्हा पहिल्यासारखं प्रेक्षकवर्ग उपस्थिती लावू शकतात का? असा प्रश्न प्रत्येकालाच पडलेला आहे. टीझरच्या माध्यमातून तरी या प्रश्नाला सकारात्मक उत्तर मिळालेलं आहे. पण शो चे मेकर्स प्रेक्षकांना निमंत्रीत करण्यावर अजुनही ठाम नाहीत, असं बोललं जातंय. अद्याप तरी करोनाच्या तिसऱ्या लाटेचे काही चिन्ह नाहीत, पण तरीही शो चे मेकर्स याबाबतीत कोणतीही रिस्क घेण्यासाठी तयार नाहीत.