News Flash

प्रेमासाठी वाट्टेल ते! हेमामालिनीसाठी धर्मेंद्रंनी केलं होतं अख्खं रुग्णालय बूक

धर्मेंद्र यांना असं का करावं लागलं?

छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय शो म्हणून ‘द कपिल शर्मा शो’कडे आज पाहिलं जातं. या शोचं सूत्रसंचालन कपिल शर्मा करत असून त्याने त्याच्या विनोदाने अनेकांच्या मनात घर केलं आहे. आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी या शोमध्ये हजेरी लावली आहे. या शोमध्ये कपिल कलाकारांची कधीही न पाहिलेली बाजू प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न करत असतो. कलाकारांना विविध प्रश्न विचारुन त्यांच्या जीवनातील अनेक मजेदार गोष्टी तो त्यांच्याकडून जाणून घेतो. लवकरच या शोमध्ये अभिनेत्री हेमामालिनी या हजेरी लावणार आहेत. त्यापूर्वी त्यांचा सेटवरील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात त्यांनी अभिनेता धर्मेंद्र यांच्याविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला. इतकंच नाही तर हेमामालिनींच्या प्रेमाखातर त्यांनी अख्ख रुग्णालय बूक केलं होतं .

हेमामालिनी आणि धर्मेंद्र यांचं लव्ह मॅरेज असून त्यांची प्रेमकथा साऱ्यांनाच ठावूक आहे. याच प्रेमाखातर हेमामालिनी रुग्णालयात दाखल झाल्या असताना धर्मेंद्र यांनी संपूर्ण रुग्णालय बूक केलं होतं. रुग्णालयात चाहत्यांचा त्रास होऊ नये साठी धर्मेंद्र यांनी ही शक्कल लढविली होती.

पाहा : ‘लागीरं झालं जी’तील जयडीचा चकित करणारा हॉट लूक

 हेमामालिनी आणि धर्मेंद्र यांनी इशा देओल आणि आहाना देओल या दोन लेकी आहेत. या दोन्ही लेकींच्या जन्माच्यावेळी धर्मेंद्र यांनी हेमामालिनींसाठी संपूर्ण रुग्णालय बूक केलं होतं. हेमामालिनी रुग्णालयात असल्याची माहिती चाहत्यांना मिळाली असती तर त्यांनी रुग्णालयात गर्दी केली असती. त्यामुळे हेमामालिनींना त्रास झाला असता. म्हणूनच त्यांनी संपूर्ण रुग्णालय बूक करण्याचा निर्णय घेतला. यावरुनच धर्मेंद्र यांचं हेमामालिनींवर किती प्रेम आहे याचा प्रत्यय येतो.

दरम्यान, हेमामालिनी आणि धर्मेद्र यांच्याप्रमाणेच त्यांची लेक इशा देओलदेखील अभिनेत्री आहे. विशेष म्हणजे अलिकडेच तिचं ‘अम्मा मिया’ हे पुस्तक प्रकाशित झालं. या पुस्तकाच्या माध्यमातून तिने पहिल्यांदाच लेखन क्षेत्रात पदार्पण केलं आहे. याच पुस्तकाच्या प्रमोशनसाठी हेमामालिनी आणि इशाने कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2020 9:46 am

Web Title: the kapil sharma show hema malini says dharmendra had booked the entire hospital for her daughter ssj 93
Next Stories
1 ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्याविरोधात गुन्हा दाखल
2 “करोनाने मोडला बाहुबलीचा विक्रम”; दिग्दर्शकाने पोस्ट केला व्हिडीओ
3 coronavirus : टॉयलेट पेपर सोडा आणि… रविनाचे भन्नाट ट्विट
Just Now!
X