अफलातून विनोदबुद्धीने प्रेक्षकांना खळखळून हसवणारा कॉमेडियन कपिल शर्मा वेब विश्वात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. कपिलने याबाबतची अद्याप अधिकृत घोषणा केली नसली तरी अक्षय कुमारने मागील एपिसोडमध्ये कपिलच्या वेब सीरिजबाबत माहिती दिली होती. या सीरिजसाठी कपिल जोरदार तयारी करत असून त्यासाठी त्याने नऊ किलो वजन कमी केलं आहे. यासंदर्भातला एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अभिनेता गोविंदाने ‘द कपिल शर्मा शो’मध्ये हजेरी लावली. त्यावेळी पडद्यामागे गप्पा मारत असताना कपिलने नऊ किलो वजन केल्याचा खुलासा केला. अर्चना पुरण सिंगने हा व्हिडीओ शूट केला असून वजन कमी केल्यावरून ती पुढे कपिलची मस्करी करते. यावेळी खुद्द कपिल वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याचं म्हणताना दिसतो.
View this post on Instagram
आणखी वाचा : हेमांगी कवीचं मुंबईत ‘घरकुल’; ‘म्हाडा’मध्ये सलग आठ वर्षे प्रयत्न केल्यानंतर लागली लॉटरी
जवळपास वर्षभर ब्रेक घेतल्यानंतर कपिल शर्मा नव्या जोमाने कामाला लागला. अनलॉकदरम्यान ‘द कपिल शर्मा शो’चं शूटिंग प्रेक्षकांविनाच सुरू झालं. मात्र आता या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटामध्ये काम केल्यानंतर आता कपिलला वेब सीरिजची ऑफर मिळाली आहे. ही सीरिज कोणती आहे आणि त्यात कपिलसोबत कोणते कलाकार झळकतील हे मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 18, 2020 10:40 am