News Flash

‘द कपिल शर्मा शो’ सोडणार का? कृष्णा अभिषेक म्हणाला…

कपिल शर्मा शोवर केला जातोय अश्लील कॉन्टेटचा आरोप; कृष्णा म्हणाला...

‘द कपिल शर्मा शो’ हा छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय विनोदी शो म्हणून ओळखला जातो. विविध क्षेत्रातील सेलिब्रिटींच्या विनोदी मुलाखती या शोमध्ये घेतल्या जातात. मात्र गेल्या काही काळात या शोमधील कॉन्टेटवर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अलिकडेच अभिनेता मुकेश खन्ना यांनी देखील कपिल शर्मावर जोरदार टीका केली होती. या पार्श्वभूमीवर कृष्णा अभिषेक शोला रामराम ठोकणार अशी चर्चा सर्वत्र केली जात आहे. या चर्चेवर अखेर स्वत: कृष्णाने मौन सोडलं आहे.

अवश्य पाहा – ये फिटनेस की बात है! पाहा मलायकाचा ‘हॉट योगा’

अवश्य पाहा – फॅट ‘गंगूबाई’चा फिट अवतार; ८ महिन्यात २२ किलो वजन केलं कमी

आज तकला दिलेल्या मुलाखतीत कृष्णाने कपिल शर्मा शोवर भाष्य केलं. तो म्हणाला, “मला विनोदी भूमिका साकारायला खूप आवडतं. द कपिल शर्मा शोच्या माध्यमातून त्या भूमिका साकारण्याची संधी मला मिळते. हा एक कौटुंबीक शो आहे. संपूर्ण कुटुंबाचं मनोरंजन या शोमधून केलं जातं. काही लोक यावर टीका करतात पण तो त्यांचा दृष्टीकोण आहे. मी हा शो सोडणार नाही. या चर्चा केवळ अफवा आहेत. प्रेक्षकांनी याकडे दुर्लक्ष करावं.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 7, 2020 1:36 pm

Web Title: the kapil sharma show krushna abhishek mppg 94
Next Stories
1 ‘अर्धा तास फोनवर बोललो आणि…’; आमिर खान- किरणची हटके लव्हस्टोरी
2 Video : कमी बजेटमध्ये मालिकांचं चित्रीकरण कसं होतं?
3 Video : लक्ष्मीकांत बेर्डे की अशोक सराफ? ‘हा’ महेश कोठारे यांचा जवळचा मित्र
Just Now!
X