News Flash

गर्लफ्रेंडला गिफ्ट देण्यासाठी रणबीर करायचा चोरी?, रिद्धिमा कपूरने केला खुलासा

नीतू कपूर आणि रिद्धिमाने 'द कपिल शर्मा' शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी रिद्धिमाने हा खुलासा केला आहे.

riddhima kapoor sahni, ranbir kapoor,
नीतू कपूर आणि रिद्धिमाने 'द कपिल शर्मा' शोमध्ये हजेरी लावली होती.

छोट्या पडद्यावरील ‘द कपिल शर्मा शो’ हा लोकप्रिय कॉमेडी शो आहे. ‘द कपिल शर्मा शो’मध्ये नेहमीच सेलिब्रिटी हजेरी लावतात. यावेळी अभिनेत्री नीतू कपूर आणि त्यांची मुलगी रिद्धिमा कपूर साहनी यांनी हजेरी लावली आहे. या शोमध्ये पहिल्यांदाच नीतू कपूर आणि रिद्धिमा कपूर साहनी एकत्र दिसणार आहेत. नुकताच शोचा एक प्रोमो प्रदर्शित झाला आहे. यात रिद्धिमा तिचा भाऊ आणि बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर विषयी काही गोष्टींचा खुलासा करते.

‘द कपिल शर्मा शो’चा हा प्रोमो सोनी टीव्हीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोत कपिल रिद्धिमाला विचारतो की ‘हे खरं आहे का की जेव्हा तू लंडनमध्ये तुझं शिक्षण पूर्ण करत होतीस तेव्हा रणबीर तुला न विचारता तुझ्या वस्तू त्याच्या गर्लफ्रेंडला भेट म्हणून द्यायचा.’ हे ऐकून रिद्धिमा हो बोलते आणि पुढे हसत तो किस्सा सांगते.

आणखी वाचा : तालिबानचे समर्थन करणाऱ्या मुस्लिमांना नसीरुद्दीन शाह यांनी झापलं, म्हणाले…

रिद्धिमा तो किस्सा सांगत म्हणते, ‘हो, मी लंडनमध्ये शिकत होती. एकदा सुट्ट्यांमध्ये मी घरी आले होते. तेव्हा त्याची एक मैत्रिण त्याला भेटायला घरी आली,’ तेवढ्यात नीतू गर्लफ्रेंड असं बोलतात आणि सगळे हसू लागतात. पुढे रिद्धिमा बोलते, ‘मग माझ्या लक्षात आलं की तिने घातलेला टॉप माझ्या टॉपसारखा आहे आणि तो मला मिळत नव्हता. नंतर मला कळलं की तो गपचूप माझ्या वस्तू तिला भेट म्हणून देतो.’ हे ऐकून सगळे हसू लागतात तर नीतू कपूर त्यांच्या डोक्याला हात लावतात.

आणखी वाचा : “मी पॅन्टवर अंडरवेअर परिधान केली तेव्हा मला…” प्रियांका चोप्राचं ‘त्या’ प्रश्नावर मजेशीर उत्तर

नीतू आणि रिद्धिमा यांचा हा एपिसोड येत्या रविवारी प्रदर्शित होणार आहे. नीतू आणि रिद्धिमा या दोघीही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत या दोघी चाहत्यांच्या संपर्कात राहतात. एवढंच नाही तर रिद्धिमाने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले नसले तरी तिचे लाखो चाहते आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 2, 2021 11:29 am

Web Title: the kapil sharma show riddhima kapoor sahni reveals ranbir kapoor gave her clothes to his girlfriend dcp 98
Next Stories
1 “मी अजून ही सुनील ग्रोव्हरच्या संपर्कात आहे” ; ‘द कपिल शर्मा’ शोमधील अभिनेत्रीचा खुलासा
2 Video: ‘आतापर्यंत चित्रपट केले बॉलिवूडसाठी…’, माधुरी दीक्षितने घेतलेला खास उखाणा ऐकलात का?
3 “एकतर ब्रा दाखव किंवा जॅकेट तरी”; क्रॉप टॉपमुळे ‘बिग बॉस ओटीटी’ स्पर्धक उर्फी जावेद ट्रोल
Just Now!
X