04 June 2020

News Flash

‘दी लंचबॉक्स’ला ‘बाफ्टा’चे नामांकन

आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजला गेलेल्या 'दी लंचबॉक्स या भारतीय चित्रपटाची 'ब्रिटीश अॅकेडमी फिल्म अॅवॉर्डस् २०१५'च्या (बीएएफटीए) परदेशी भाषेतील चित्रपटाच्या विभागामध्ये निवड करण्यात आली आहे.

| January 9, 2015 06:41 am

आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजला गेलेल्या ‘दी लंचबॉक्स या भारतीय चित्रपटाची ‘ब्रिटीश अॅकेडमी फिल्म अॅवॉर्डस् २०१५’च्या (बीएएफटीए) परदेशी भाषेतील चित्रपटाच्या विभागामध्ये निवड करण्यात आली आहे. ‘बाफ्टा’च्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या माहितीनुसार निम्रत कौर आणि इरफान खानचा अभिनय असलेल्या या चित्रपटाची पोलीश-डॅनिश चित्रपट ‘आयडा’, रशियन चित्रपट ‘लेविआथन’, ब्राझिलियन-ब्रिटीश चित्रपट ‘ट्रॅश’ आणि बेल्जियन चित्रपट ‘टू डेज, वन नाईट’ या चित्रपटांशी स्पर्धा आहे. रितेश बत्रा दिग्दर्शित ‘दी लंचबॉक्स’ चित्रपटात प्रेमासाठी आसुसलेली गृहिणी आणि एकटेपणाचे जिवन कंठत असलेल्या व्यक्तीमधील प्रेम कहाणी अत्यंत खुबीने दर्शविण्यात आली आहे. २०१३ साली भारतात प्रदर्शित झालेला हा चित्रपट २०१४ साली ब्रिटनमध्ये प्रदर्शित झाला होता. अनेक निर्माते असलेल्या या चित्रपटाने कान, झुरीच, लंडन आणि टोरांटोसह अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये हजेरी लावली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 9, 2015 6:41 am

Web Title: the lunchbox gets bafta nomination
Next Stories
1 रणबीर-कतरिनाचा गुपचूप साखरपुडा?
2 नवाजुद्दीन सिध्दिकीकडून खूप काही शिकलो – वरुण धवन
3 चित्रपटात काम करण्यापेक्षा मातृत्त्वाचा आनंद घेण्यात अधिक रस – शिल्पा शेट्टी
Just Now!
X