30 September 2020

News Flash

Video : ‘भाई : व्यक्ती की वल्ली’ उत्तरार्धातील ‘नाच रे मोरा’ गाणं प्रदर्शित

पुलंचं साहित्य, नाटकातलं योगदान ते उतारवयातील पु.ल. असा प्रवास उत्तरार्धात पाहायला मिळणार आहे.

‘भाई -व्यक्ती की वल्ली’ या चित्रपटाचा उत्तरार्ध लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्यापूर्वी पु.ल. देशपांडे यांनी संगीतबद्ध केलेल्या आणि अतिशय गाजलेल्या ‘नाच रे मोरा’ या गाण्याचा व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

‘भाई’च्या पहिल्या भागातही ‘कानडा राजा पंढरीचा’ हे गाणं पाहायला मिळालं होतं. ‘कानडा राजा पंढरी’चा या गाण्याचं नवं रुप या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. पहिल्या भागातील जुगलबंदीला मिळालेल्या प्रतिसादानंतर आता दुसरा भाग प्रदर्शित होताना नव्याने ‘नाच रे मोरा हे गाणे रसिकांना अनुभवता येणार आहे.

उत्तरार्धात सुनीताबाई देशपांडे यांच्याबरोबरच जवाहरलाल नेहरू, बाळासाहेब ठाकरे, बाबा आमटे, भीमसेन जोशी, दुर्गा भागवत, वसंतराव देशपांडे, कुमार गंधर्व अशा अनेक व्यक्तिमत्त्वांचा समावेश आहे. पुलंचे लहानपण, आई-वडिलांचे संस्कार, भावंडांचे प्रेम, सुनीताबाईंचा त्यांच्या आयुष्यातील प्रवेश आणि कलाकार म्हणून पुलंचे घडत जाणे हे सगळे खूप सुंदर पद्धतीनं पहिल्या भागात पाहायला मिळाले. आता दुसऱ्या भागात पुलंची आणखी एक बाजू पाहायला मिळणार आहे. पुलंचं साहित्य, नाटकातलं योगदान ते उतारवयातील पु.ल. असा प्रवास उत्तरार्धात पाहायला मिळणार आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2019 7:36 pm

Web Title: the makers of bhaai vyakti kee valli have unveiled one of the most soulful songs from the film nach re mora
Next Stories
1 नवाजुद्दीनच्या कुटुंबातील हा व्यक्ती करतोय बॉलिवूडमध्ये पदार्पण
2 भाभीजी काँग्रेस मे है ! शिल्पा शिंदेचा राजकारणात प्रवेश
3 परीक्षेचा ताण दूर करू पाहणारा चित्रपट ‘१० वी’
Just Now!
X