News Flash

असा साकारला ‘पद्मावती’चा शाही पोशाख

दीपिकाच्या लेहंग्यापासून शाहिदच्या अंगरख्यापर्यंत सर्व पोशाख यांनीच डिझाइन केले.

पद्मावती, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ हा चित्रपट विविध कारणांमुळे लक्षवेधी ठरतोय असं म्हणावं लागेल. मग यावरून सुरु असलेला वाद असो किंवा एकंदरीत चित्रपटातील कलाकारांचा पेहराव, सर्वच गोष्टी प्रेक्षकांना आश्चर्यचकित करणाऱ्या आहेत. चित्रपटाच्या कथानकावरून कितीही टीका होत असल्या तरी यातील भरजरी आणि वजनदार पोशाखांना आणि लक्षवेधी सेट्सना दुर्लक्ष करता येणार नाही. ट्रेलर, पोस्टर आणि ‘घुमर’ या गाण्यातील कलाकारांचे पोशाख यांचीही जोरदार चर्चा झाली. दीपिकाच्या लेहंग्यापासून शाहिदच्या अंगरख्यापर्यंत सर्व पोशाख रिम्पल आणि हरप्रीत नरुला यांनी डिझाइन केले आहेत. ‘पिंकविला’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत या दोघांनी चित्रपटातील पोशाखांबद्दल, भन्साळी यांच्यासोबत काम करताना आलेला अनुभव या सर्व गोष्टी सांगितल्या.

‘यापूर्वी आम्ही कोणत्याही चित्रपटासाठी कपडे डिझाइन केले नव्हते. नव्या प्रतिभेला संधी देऊन, आमच्यावर विश्वास ठेवून भन्साळी यांनी इतका मोठा प्रोजेक्ट दिला. तीन मोठ्या कलाकारांच्या पोशाखांवर काम करणं ही आमच्यासाठी एक मोठी परीक्षाच होती. भन्साळी यांच्यासोबत काम करत असताना दररोज नवीन काहीतरी आणण्याचा प्रयत्न आम्ही केला,’ असं ते म्हणाले.

या चित्रपटात भव्यतेच्या परिभाषा बदलणार याची प्रेक्षकांना अपेक्षा होतीच. पण, भन्साळींनी चित्रपटातील वेशभूषेचीही परिभाषा बदलली आहे असं म्हणायला हरकत नाही. भन्साळींच्या या स्वप्नवत चित्रपटासाठी दीपिकाने जवळपास ३५ किलोंचा लेहंगा घातला होता. ज्यासोबत असलेल्या ओढणीचं वजन चार किलो होतं.

PHOTO : जुही चावलाच्या मुलीचा फोटो पाहिलात का?

‘पद्मावती’तील कलाकारांचा एकंदर पेहराव पाहता काळानुरुप बदलांसोबतच पारंपरिकपणाही जपल्याचं सहज दिसून येतं. यामध्ये फॅशन डिझायनर रिम्पल, हरप्रीत नरुला आणि त्यांच्या कारागिरांची मेहनत प्रशंसनीय आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2017 2:33 pm

Web Title: the making of padmavati costumes by rimple and harpreet narula
Next Stories
1 PHOTO : जुही चावलाच्या मुलीचा फोटो पाहिलात का?
2 ६८ दिवसांचा तो नियम ‘फुकरे रिटर्न्स’ला का नाही?
3 …म्हणून दीपिकाला साथ देण्यास कंगनाचा नकार
Just Now!
X