31 October 2020

News Flash

जयपूरच्या रस्त्यांवर पापड विकतोय बॉलिवूडचा हॅण्डसम हंक

याला ओळखलंत का?

(छाया सौजन्य : ट्विटर)

हृतिक रोशनची मुख्य भूमिका असलेला ‘सूपर ३०’ हा सिनेमा या वर्षांत प्रदर्शित होणार आहे. या चित्रिकरणादरम्याचा हृतिकचा आणखी एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात हृतिक जयपूरच्या रस्त्यावर पापड विकताना दिसत आहे. बॉलिवूडच्या या हँडसम हंकला साध्या वेशात पाहून अनेकांना विश्वासच बसत नव्हता. साधे कपडे, खांद्यावर रुमाल, सायकल आणि तिच्या मागे टोपलीत विकायला ठेवलेल्या वस्तू अशा रुपात हृतिक दिसत होता. त्यामुळे या वेशात हृतिक कोणालाच ओळखू येत नव्हता.

सध्या पाटणा, वाराणसी, मुंबई , जयपूर अशा वेगवेगळ्या शहरांत सूपर ३० चे  चित्रिकरण सुरू आहे.  या चित्रपटात हृतिक आयआयटी कोचिंग संस्थेचे संस्थापक आनंद कुमार यांची भूमिका साकरात आहे. आनंद कुमार यांनी अनेक गरिब विद्यार्थ्यांना आयआयटीसाठी मोफत शिक्षण दिलं आहे.  काही दिवसांपूर्वी हृतिकनं आपल्या चित्रपटातला फर्स्ट लूक लाँच केला होता. हा फोटो पाहून आनंद कुमार यांनीदेखील हृतिकचं कौतुक केलं होतं. हृतिकचा हा लूक पाहून मला कॉलेजचे दिवस आठवले, त्यावेळी मीही अगदी हुबेहूब हृतिकसारखाच दिसत होतो असं आनंद कुमार पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.

हृतिकच्या सुपर ३० या चित्रपटातून मराठमोळी अभिनेत्री मृणाल ठाकूर ही बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. नोव्हेंबरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याच महिन्यात करण जोहरचा ‘स्टुडंट ऑफ द इयर २’ हा चित्रपटदेखील प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2018 12:57 pm

Web Title: the pictures of hrithik selling papad on the streets of jaipur form the movie super 30 goes viral
Next Stories
1 Priya Varrier case: प्रिया वरियरला सुप्रीम कोर्टाचा दिलासा
2 PHOTO : ‘अॅपल’च्या जाहिरातीवर झळकणारा रहमान पहिला भारतीय सेलिब्रिटी
3 मलाइकाचं चाललंय काय?
Just Now!
X