27 February 2021

News Flash

‘बेस्ट विलन का अवॉर्ड तो मुझे ही मिलेगा’; पाहा झायरा वसीमच्या शेवटच्या चित्रपटाचा ट्रेलर

यामध्ये प्रियांका चोप्रा झायराच्या आईची भूमिका साकारत आहे.

'द स्काय इज पिंक'

काही जण नावाच्या जोरावर काम करतात तर काही उत्तम काम करून नाव कमावतात. या दुसऱ्या प्रकारात ‘दंगल’ फेम अभिनेत्री झायरा वसीम मोडते. मोठमोठ्या कलाकारांनी तिच्या अभिनय कौशल्याची प्रशंसा केली आहे. मात्र प्रेक्षकांना पडद्यावर तिचा अभिनय आता पाहता येणार नाही. कारण झायराने बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर तिचा शेवटचा ‘द स्काय इज पिंक’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. यामध्ये प्रियांका चोप्रा, झायरा वसीम, फरहान अख्तर, रोहित सराफ यांच्या मुख्य भूमिका आहेत.

एका कुटुंबाची ही भावनिक कथा आहे. ज्यामध्ये प्रियांका-फरहानची प्रेमकहाणी आणि त्यानंतर त्यांच्या मुलीला होणारा दुर्मिळ आजार याबद्दल दाखवण्यात आले आहे. किशोरवयीन झायरा त्यांच्या आई-वडिलांची प्रेमकहाणी सांगतानाच ट्रेलरची सुरुवात होते. आपल्या मुलीला झालेल्या आजारविषयी समजल्यानंतर त्या कुटुंबावर कोणता आघात होतो हे यातून पाहायला मिळते.

शोनाली बोस दिग्दर्शित हा चित्रपट ११ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. प्रियांका या चित्रपटातून तीन वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये परतत आहे. २०१६ मध्ये तिचा ‘जय गंगाजल’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 10, 2019 12:05 pm

Web Title: the sky is pink trailer priyanka chopra farhan akhtar zaira wasim ssv 92
Next Stories
1 …म्हणून अनुराग कश्यपला ‘तेरे नाम’मधून काढून टाकण्यात आले
2 ‘मी प्रेमात कसा पडलो हे माझे मलाच पडलेले कोडे आहे’
3 VIDEO: सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला पण वितरक मिळेना
Just Now!
X