WWE सुपरस्टार ‘द अंडरटेकर’ स्पोर्ट्स एन्टरटेन्मेंट क्षेत्रातील सर्वाधिक लोकप्रिय खेळाडूंपैकी एक म्हणून ओळखला जातो. दोन वर्षांपूर्वी त्याने WWE मधून निवृत्ती घेतली होती. परंतु आता चाहत्यांच्या आग्रहाखातर वयाच्या ५४ व्या वर्षी पुन्हा एकदा तो रिंगमध्ये फाईटिंग करताना दिसेल असे संकेत WWEने दिले आहेत.

नेटफ्लिक्सला मोठा फटका.. महिन्याभरात दशलक्ष सबस्क्राइबर्स गमावले कारण..

‘रेसलमेनिया’ ही WWE मधील सर्वात मोठी स्पर्धा असते. वर्षातून एकदा खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेचे यंदाचे ३६वे वर्ष आहे. मात्र, चाहत्यांमध्ये ‘रेसलमेनिया -३६’ बाबत अद्याप म्हणावा तसा उत्साह दिसलेला नाही. त्यामुळे चाहत्यांना पुन्हा एकदा रिंगच्या दिशेने खेचण्यासाठी WWEने चक्क निवृत्त झालेल्या अंडरटेकरलाच मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला.

Flashback 2019: जगभरात सर्वाधिक वेळा पाहिले गेलेले २० फोटो

WWEचा व्यवस्थापक ट्रिपल एच याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अंडरटेकरच्या पुनरागमनाचे संकेत दिले. “अंडरटेकर WWE मधील सर्वाधिक लोकप्रिय खेळाडू आहे. त्याने पुन्हा एकदा रिंगमध्ये यावे अशी चाहत्यांची इच्छा आहे. चाहत्यांच्या आग्रहाखात आम्ही अंडरटेकरशी चर्चा करत आहोत. आम्हाला आशा आहे अंडरटेकर आपल्या चाहत्यांसाठी WWEमध्ये परतेल.” अशी माहिती ट्रिपल एचने आपल्या मुलाखतीत दिली. दरम्यान WWE सुपरस्टार सेत रॉलेंस याने अंडरटेकरबरोबर फाईट करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.