News Flash

Video : ‘ये मेरी फॅमिली’ है या नव्या वेबसिरिजमधून मोना सिंग प्रेक्षकांच्या भेटीला

'परमनंट रुममेट' , 'ट्रिपलिंग' यांसारख्या मालिकांच्या दमदार यशानंतर 'टीव्हीएफ' चॅनेल 'ये मेरी फॅमिली' ही नवी कोरी मालिका लवकरच घेऊन येत आहे.

Video : ‘ये मेरी फॅमिली’ है या नव्या वेबसिरिजमधून मोना सिंग प्रेक्षकांच्या भेटीला
सात भागांची ही मालिका असून येत्या १२ जुलैपासून ही मालिका सुरू होणार आहे.

वीसएक वर्षांपूर्वीची गोष्टच काही वेगळी होती. तेव्हा मोबाईल नव्हते, तेव्हा इंटरनेटचाही वापर फारसा नव्हता. मुलं घरात कमी आणि मैदानात जास्त खेळायची. घरातल्या प्रत्येकाकडे एकमेकांसाठी खूप वेळ आसायचा. त्याकाळच्या अशाच अनेक आठवणींना उजाळा देणारी वेब सिरिज लवकरच सुरू होत आहे.

‘परमनंट रुममेट’ , ‘ट्रिपलिंग’ यांसारख्या मालिकांच्या दमदार यशानंतर ‘टीव्हीएफ’ चॅनेल ‘ये मेरी फॅमिली’ ही नवी कोरी मालिका लवकरच घेऊन येत आहे. सात भागांची ही मालिका असून येत्या १२ जुलैपासून ही मालिका सुरू होणार आहे. ही कौटुंबिक वेबसिरीज असून छोट्या पडद्यावरची स्टार मोना सिंग या सिरिजमध्ये मुख्य भूमिकेत असणार आहे.

मोना व्यतिरिक्त आकर्ष खुराना हे देखील या वेबसिरिजमध्ये दिसणार आहेत. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्या कुटुंबाला एकत्र बांधून ठेवण्यासाठी धडपडणाऱ्या पालकांची भूमिका हे दोघंही साकारता दिसणार आहेत. याव्यतिरिक्त यात काही बालकलाकार देखील असणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2018 6:52 pm

Web Title: the viral fever launches the trailer of its upcoming nostalgic 90s show yeh meri family
Next Stories
1 ..म्हणून रणवीरला मिळालं ८ लाख रुपयांचं घड्याळ
2 VIDEO : बाबा बोलता है अब बस हो गया; ‘संजू’ने घेतली पत्रकारांची शाळा
3 Karenjit Kaur The Untold Story of Sunny Leone teaser: पॉर्न स्टार ते बॉलिवूड अभिनेत्री; या बायोपिकमधून उलगडणार सनीचा प्रवास