News Flash

Video : पाहा, प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा ‘द व्हाइट टायगर’चा ट्रेलर

द व्हाइट टायगरमध्ये पहिल्यांदाच झळकणार राजकुमार- प्रियांकाची जोडी

‘देसी गर्ल’ ते ‘क्वांटिको गर्ल’ असा प्रवास करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर कायमच चर्चेत असते. कधी तिच्या चित्रपटांमुळे तर कधी तिच्या पर्सनल लाइफमुळे. प्रियांका कायमच चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. प्रियांका लवकरच द व्हाइट टायगर या आगामी चित्रपटात झळकणार असून त्याचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर पुन्हा एकदा प्रियांकाची चर्चा सुरु झाली आहे.

या चित्रपटात प्रियांका आणि राजकुमार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमधून प्रियांका- राजकुमार दिल्लीतस्थित एका श्रीमंत जोडप्याची भूमिका साकारत असल्याचं दिसून येत आहे. तर अभिनेता आदर्श गौरव त्यांच्या कारचालकाची म्हणजेच बलराम ही भूमिका साकारकत आहे. श्रीमंत होण्याची स्वप्न पाहणारा बलराम त्याला शक्य होईल तितके प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो. मात्र, एका वळणावर श्रीमंत होण्याच्या ध्येयाने पछाडलेला बलराम चुकीच्या मार्गाला लागतो आणि या चित्रपटाची संपूर्ण कथा पालटते. या कथेत नेमकं काय होतं हे चित्रपट पाहिल्यानंतरच प्रेक्षकांना समजणार आहे.


‘द व्हाइट टायगर’ हा चित्रपट अरविंद अडिग यांच्या ‘द व्हाइट टाइगर’ या पुस्तकावर आधारित आहे. हा चित्रपट लवकरच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन रमिन बहरानी करणार आहेत. तर मुकुल देवडा या चित्रपटाची निर्मिती करत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2020 10:57 am

Web Title: the white tiger trailer priyanka chopra starrer explores india class struggle netflix dcp 98 ssj 93
Next Stories
1 त्या रात्री नेमकं काय घडलं? हल्ल्यानंतर अभिनेत्री मालवीने केला धक्कादायक खुलासा
2 ‘फॅशन’मधील कंगना-प्रियांकाच्या भूमिका ‘या’ मॉडेल्सच्या आयुष्यावर आधारित
3 राहुल वैद्य म्हणजे ‘बिग बॉस १४’ मधील कचरा; करण पटेलची टीका
Just Now!
X