11 December 2017

News Flash

हेमा मालिनी यांच्या गोदामात चोरी, ९०,०००चा ऐवज चोरीला

... त्याचाच या चोरीमागे हात असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: October 5, 2017 3:01 PM

हेमा मालिनी

ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या अंधेरी येथील गोदामात चोरी झाली असून, त्यातील ९० हजाराचा ऐवज चोरीला गेला आहे. डान्स शो आणि काही चित्रपटांमध्ये वापरण्यात आलेली इमिटेशन ज्वेलरी, कपडे आणि काही महत्त्वाच्या वस्तू ठेवण्यासाठी या गोदामाचा वापर करण्यात यायचा. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हेमा यांच्याकडे घरकाम करणारा व्यक्ती त्या गोदामाची गेल्या पाच दिवसांपासून साफसफाई करत होता. त्यामुळे त्याचाच या चोरीमागे हात असल्याचा अंदाज जुहू पोलिसांनी वर्तवला आहे.

गोदामाची साफसफाई करणारी व्यक्ती फरार असल्याचं लक्षात येताच या सर्व प्रकरणी हेमा यांच्या मॅनेजरने पोलिसांत तक्रार दाखल केली. सदर व्यक्तीचा दूरध्वनीच्या माध्यमातून संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला खरा, पण तो प्रयत्नही अपयशी ठरला. एका वेबसाइटने हेमा मालिनी यांनी या सर्व प्रकरणी विचारलं. हा सर्व प्रकार आमच्याच ओळखीतील एका व्यक्तीने केला आहे. त्यामुळे मला याविषयी आता काहीच वक्तव्य करायचं नाही. यामध्ये चित्रीकरणासाठी आणि विविध कार्यक्रमांसाठी वापरण्यात आलेलं बरंच सामान चोरीला गेलं आहे.

वाचा : अभिनयाव्यतिरिक्त बॉलिवूडकरांचे ‘हे’ आहेत ‘इन्कम सोर्स’

सध्याच्या घडीला हे चोरीचं वृत्त चित्रपट वर्तुळात वाऱ्यासारखं पसरलं असून, त्याविषयीच्या चर्चा रंगत आहे. या चोरीमध्ये ९० हजारांची इमिटेशन ज्वेलरी, गोदामातील दोन कपाटं आणि काही कपडेसुद्धा चोरीला गेले असल्याचंही कळत आहे.

वाचा : २७ मे १९९४ ला होणार होतं सलमानचं लग्न, पण..

First Published on October 5, 2017 3:01 pm

Web Title: theft in bollywood actress hema malinis andheri godown