News Flash

शाहिदच्या पत्नीला ट्रोल केल्यामुळे इशान संतापला

त्या जाहिरातीनंतर, वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी वाढत्या वयाची चिन्हं लपवण्याच्या सौंदर्यप्रसाधनाची गरजच काय, असा प्रश्नही मीराला अनुसरुन अनेकांनी उपस्थित केला.

शाहिद कपूर, मीरा राजपूत कपूर, इशान खट्टर

अभिनेता शाहिद कपूर आणि मीरा राजपूत कपूर ही सेलिब्रिटी जोडी सर्वांच्याच आवडीची आहे. कुटुंब आणि कलाविश्वाची असणारी बांधिलकी जपत या जोडीने आजवर सर्वांचीच मनं जिंकली आहेत. शाहिदचा कलाविश्वात असणारा वावर पाहता त्याची पत्नी मीरा या कलाविश्वात ज्या वेगाने रुळली त्यावरुन तीसुद्धा अभिनय क्षेत्रात पदार्पण करेल असा अंदाज अनेकांनीच वर्तवला. चित्रपटाचं ठाऊक नाही. पण, एका सौंदर्यप्रसाधनाच्या जाहिरातीतून मीरा झळकली आणि अनेकांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

अभिनय क्षेत्रात तिने एक प्रकारे पदार्पणच केल्याचं पाहून बऱ्याचजणांनी तिची प्रशंसा केली. पण, तिच्यावर काहींनी तोफही डागली, तिची खिल्ली उडवली. वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी वाढत्या वयाची चिन्हं लपवण्याच्या सौंदर्यप्रसाधनाची गरजच काय, असा प्रश्नही अनेकांनी उपस्थित केला. सध्यातरी यावर मीराने कोणतच उत्तर दिलं नाही. पण, तिच्या कुटुंबाला या साऱ्यामुळे मतस्ताप झाला असून, शाहिदच्या भावाने म्हणजेच इशान खट्टरने ही परिस्थिती पाहून आपल्याचा चिड आल्याची प्रतिक्रिया दिली.

‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत इशान म्हणाला, ‘हे सर्व बरंच संतापजनक आहे. सोशल मीडियावर असे बरेच लोक आहेत जे एखाद्या गोष्टीवर गरज नसतानाही व्यक्त होतात. आपलं मत नोंदवतात. पण, प्रत्येकालाच व्यक्त होण्याचा हक्क आहे. एक कलाकार आणि एक व्यक्ती म्हणून कोणापासून तरी प्रेरणा घेऊन आपलं कौशल्य आणखी खुलवण्याच्या दिशेने पावलं उचलणं माझ्यासाठी कधीही महत्त्वाचं असतं. माझ्यामते यात नकारात्मक असं काहीच नाही. त्यामुळे सध्यातरी मी या गोष्टींपासून स्वत:ला शक्य तितका दूर ठेवतो.’

पाहा : Loveratri Trailer : ‘लवरात्री’तून पाहता येणार नौरात्रोत्सव आणि प्रेमाचे अनोखे रंग

इशानच्या या वक्तव्यामुळे त्याने टीकाकारांना सौम्य शब्दांत सुनावलं आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. पण, आता या प्रकरणावर खुद्द शाहिद किंवा मीराची प्रतिक्रिया काय असेल हे पाहणंही फार महत्त्वाचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 10, 2018 12:57 pm

Web Title: there is a lot of frustration says actor ishaan khatter on criticism against shahid kapoors wife mira rajputs beauty cream ad
Next Stories
1 Book Lovers Day : पुस्तकांच्या सानिध्यात रमली सोनाली
2 Video : राधे माँची मुख्य भूमिका असलेल्या ‘राह दे माँ’ वेब सीरिजचा ट्रेलर पाहिलात का?
3 जेव्हा लॉर्ड्सच्या मैदानात रणवीरने घेतली क्रिकेटच्या देवाची भेट
Just Now!
X