News Flash

“इंडस्ट्रीमध्ये पक्षपातीपणा खूप आहे”; जॉनी लिव्हरच्या मुलीचा खुलासा

बॉलिवूडमधल्या घराणेशाहीवर जॉनी लिव्हरच्या मुलीचं भाष्य

इंडस्ट्रीमध्ये प्रत्येक स्टारकिडला घराणेशाहीचा फायदा मिळतो असं नाही. पण इथे पक्षपातीपणा खूप आहे, असा खुलासा प्रसिद्ध कॉमेडियन जॉनी लिव्हर यांची मुलगी जेमी हिने केला आहे. बॉलिवूडमध्ये घराणेशाहीपेक्षा पक्षपातीपणा अधिक जाणवतो, असं ती म्हणाली. ‘मिड डे’ला दिलेल्या मुलाखतीत तिने इंडस्ट्रीमधील घराणेशाहीवर भाष्य केलं.

“जेव्हा लोक घराणेशाहीबद्दल बोलतात, तेव्हा प्रत्येक स्टार किडला त्याचा फायदा मिळतो असं नाही. स्टारकिड असून इंडस्ट्रीतील माझा प्रवास इतरांपेक्षा वेगळा आहे. इथे पक्षपातीपणा खूप आहे. काही लोकांची गटबाजी, मित्रमैत्रिणींच्या मुलांना संधी देणं अशा गोष्टी खूप चालतात. माझे बाबा फक्त काम करायचे आणि घरी यायचे. आम्ही कधीच कोणत्या पार्टीमध्ये गेलो नाही किंवा विशिष्ट गटाशी स्वत:ला जोडून घेतलं नाही”, असं तिने सांगितलं.

कुठल्याही ऑडिशनसाठी जाताना वडिलांच्या नावाचा कधीच वापर केला नसल्याचं जेमीने सांगितलं. तिच्या करिअरसाठी जॉनी लिव्हर यांनी कधी कोणाला फोन केला नाही, असंही तिने स्पष्ट केलं.

जेमी सोशल मीडियावर फार सक्रीय असून तिच्या मिमिक्रीचं खूप कौतुक होतं. सोनम कपूर, फराह खान यांसारख्या कलाकारांची ती हुबेहूब नक्कल करते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2020 5:06 pm

Web Title: there is favouritism no nepotism in bollywood says comedian johny lever daughter jamie ssv 92
Next Stories
1 पु. ल. देशपांडेंचं नाटक ते ब्रह्मदेशाचा राजा; पाहा संजय मोनेंच्या नावाचा धम्माल किस्सा
2 “सुशांतच्या मृत्यूसाठी बॉलिवूडला दोष देणं थांबवा”; रवीना टंडनने टीकाकारांना दिलं प्रत्युत्तर
3 Video : अशोक पत्की सांगतात, ‘मुखड्याचा कवी म्हणजे काय?’
Just Now!
X