News Flash

बॉलिवूडमधील ‘हे’ सेलिब्रिटी आहेत आजाराने त्रस्त

काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं

ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांना काही दिवसांपूर्वी लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पोटदुखीमुळे त्या त्रस्त असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती समोर आली होती. त्यांना डायवर्टिकुला हा आजार झाल्याचं सांगण्यात येत आहे. केवळ तनुजाच नाही तर बॉलिवूडमधील असे अनेक कलाकार आहेत जे अनेक आजारांनी त्रस्त आहेत. यामध्ये सोनाली बेंद्रे, ऋषी कपूर, अमिताभ बच्चन यांसारख्या कलाकारांचा समावेश आहे.

१. अमिताभ बच्चन – बॉलिवूडचा महानायक, बिग बी, शहेनशहा अशा अनेक नावांनी ओळखले जाणारे अमिताभ बच्चन गेल्या ३७ वर्षांपासून लीवरच्या आजाराने त्रस्त आहेत. कुली चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान ते गंभीररित्या जखमी झाले होते. तेव्हापासून त्यांना पोटदुखीची समस्या सुरु झाली आहे. हा त्रास त्यांना आजपर्यंत सहन करावा लागत आहे.

amitabh bachchan अमिताभ बच्चन

२. दिलीप कुमार –
ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या फुफ्फुसांना जंतुसंसर्ग झाल्यामुळे त्यांची प्रकृती सध्या ठिक नसते. आतापर्यंत अनेक वेळा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. फुफ्फुसांच्या जंतुसंसर्गाव्यतिरिक्त ते किडनीच्या समस्येनेदेखील त्रस्त आहेत.

३. मिथुन चक्रवर्ती – अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांना क्रॉनिक बॅक पेनच्या समस्येने त्रस्त आहेत. पाठदुखीमुळे त्रस्त असलेल्या मिथुन यांच्यावर अमेरिकेतील लॉस एंजलिस येथे अपचारही करण्यात आले होते. या उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीमध्ये थोड्या फार प्रमाणात सुधारणा झाली आहे.

मिथुन चक्रवर्ती

४. ऋषी कपूर –
आपल्या वादग्रस्त ट्विटमुळे कायम चर्चेत राहणारे ऋषी कपूर यांना कर्करोगाचे निदान झाले असून सध्या त्यांच्यावर न्युयॉर्कमध्ये उपचार सुरु आहेत. यावेळी त्यांच्यासोबत सतत पत्नी नितू कपूर असल्याचं पाहायला मिळतं. मात्र ऋषी कपूर यांना नक्की कोणता कर्करोग झाला आहे, याविषयीचा कोणताही खुलासा अद्याप झालेला नाही. दरम्यान, कलाविश्वातील अनेक कलाकारांनी न्युयॉर्कला जाऊन त्यांची भेट घेतली.

५. सोनाली बेंद्रे –
बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री सोनाली बेंद्रेला हाय ग्रेड कॅन्सर झाला होता. याविषयीची माहिती तिने स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली होती. विशेष म्हणजे आजारपणात खचून न जाता सोनाली या साऱ्याला धीराने सामोरी गेली त्यामुळे तिच्यावर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे. नुकतीच भारतात परतलेली सोनाली सध्या विविध कार्यक्रमांना हजेरी लावत असून यावेळी ती तिच्या आजारपणातील प्रवासाविषयी व्यक्त होतांना दिसत आहे.

sonali सोनाली बेंद्रे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2019 10:37 am

Web Title: these big stars of bollywood are struggling with serious illness
Next Stories
1 Happy Birthday R. Madhavan : …तर अभिनेता होण्याऐवजी आर.माधवन झाला असता आर्मी ऑफिसर
2 चित्र रंजन : बाऽऽबो..!
3 प्रभुदेवाचे ‘मुक्कला मुकाबला’ गाणे पंचवीस वर्षांनी पुन्हा एकदा नव्या रुपात
Just Now!
X