31 October 2020

News Flash

Bigg Boss Marathi 2: ‘फिनाले’मध्ये पोहोचले हे दोन स्पर्धक

'फिनाले'मध्ये कोणते स्पर्धक पोहोचणार आणि कोण शो जिंकणार हे जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना आहे.

'बिग बॉस मराठी2'

‘बिग बॉस मराठी’चा ८७वा दिवस सुरू आहे आणि लवकरच या बहुचर्चित रिअॅलिटी शोचा दुसरा सिझन प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ‘फिनाले’मध्ये कोणते स्पर्धक पोहोचणार आणि कोण शो जिंकणार हे जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना आहे. दोन स्पर्धकांनी अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित केलं आहे.

नेहा शितोळे आणि शिवानी सुर्वे या दोघींनी अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित केलं आहे. नेहाला ९ पैकी ८ आणि शिवानीला ९ पैकी ५ मतं मिळाली. या सिझनचं हे शेवटचे नॉमिनेशन होतं. तशी घोषणाच बिग बॉसने केली. यानंतर सगळेच सदस्य भावूक झाले. या आठवड्यात आरोह, किशोरी, वीणा आणि शिव घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये नॉमिनेट झाले आहेत, पण मतदान प्रक्रिया बंद आहेत. त्यामुळे पुढे काय होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

पाहा फोटो : महेश मांजरेकरांची मुलगी आहे सौंदर्यवती; ‘दबंग ३’मधून करणार पदार्पण

बिग बॉसच्या घरात मंगळवारी जुने सदस्य पुन्हा आले होते. या जुन्या सदस्यांना बिग बॉसने कार्य सोपवले होते. त्यामध्ये या सदस्यांनी त्यांच्या दृष्टीने सर्वोत्तम असणाऱ्या दोन सदस्यांची नावे बिग बॉसकडे सुपूर्द करायची होती. नऊपैकी आठ मते मिळवणाऱ्या पहिल्या स्पर्धकाला फिनालेमध्ये जागा मिळणार होती. घरातील जुन्या सदस्यांनी मतदान केल्यानंतर नेहा शितोळेला आठ मते मिळाली. तर, शिवानी सुर्वेला पाच मते मिळाली. त्यामुळे या दोघीजणी अंतिम फेरीत दाखल झाली असल्याची घोषणा बिग बॉसने केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 22, 2019 1:16 pm

Web Title: these contestants enters in final of bigg boss marathi 2 ssv 92
Next Stories
1 शाहरुख खानवर आली काम मागण्याची वेळ?
2 ‘द रॉक’च्या दुसऱ्या लग्नात बायकोने घातला लाखोंचा गाऊन, जाणून घ्या किंमत
3 ‘नेटफ्लिक्स’साठी प्रियांका चोप्रा होणार सुपरहिरो
Just Now!
X