30 March 2020

News Flash

या पाच अभिनेत्रींनी धुडकावली होती ‘कुछ कुछ होता है’ची ऑफर

हा चित्रपट आजही आवडीने पाहिला जातो.

'कुछ कुछ होता है'

आजवर चित्रपटसृष्टीमध्ये अनेक चित्रपटांची निर्मिती झाली. या चित्रपटांच्या माध्यमातून सामाजिक, आर्थिक आणि राजकीय अशा अनेक मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यात आला. तर काही चित्रपटातून प्रेमकथा उलगडण्यात आल्या. त्यातलाच एक चित्रपट म्हणजे ‘कुछ कुछ होता है’. ९० च्या दशकात आलेल्या या चित्रपटाचं आजही प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता शाहरुख खान, राणी मुखर्जी आणि काजोल मुख्य भूमिकेत झळकले आहेत. त्यांच्या अभिनयामुळे हा चित्रपट आजही तेवढ्याच आवडीने पाहिला जातो. मात्र सुपरहिट ठरलेल्या या चित्रपटात झळकण्यास बॉलिवूडमधील काही अभिनेत्रींनी नकार दिला होता.

१. ऐश्वर्या राय बच्चन – बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या रायनेदेखील या चित्रपटासाठी नकार दिला होता. मात्र काही वैयक्तिक कारणासाठी तिने ही ऑफर धुडकावून लावली होती.

२. करिश्मा कपूर – त्याकाळी करिश्मा आघाडीची अभिनेत्री होती. त्यामुळे ती आपल्या चित्रपटात झळकावी अशी प्रत्येक दिग्दर्शकाची इच्छा होती. याकारणास्तव तिला कुछ कुछ होता है’ ची ऑफर देण्यात आली होती. मात्र अन्य एका प्रोजेक्टमध्ये व्यस्त असल्यामुळे तिने या चित्रपटाला नकार दिला होता.

३. शिल्पा शेट्टी – शिल्पाने १९९३ साली ‘बाजीगर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. शिल्पाने आतापर्यंत ४० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केलं असून कुछ कुछ होता है साठी मात्र तिने नकार दिला होता.

४. उर्मिला मातोंडकर – उर्मिला मातोंडकरने तिच्या कारकिर्दीमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्यामुळे कुछ कुछ होता है या चित्रपटात ती झळकल्यास याचा फायदा चित्रपटाला झाला असता, याकारणामुळे तिला विचारणा करण्यात आली होती. मात्र उर्मिलानेही हा चित्रपट करण्यास स्पष्टपणे नकार दिला होता.

५. तब्बू – तब्बूला या चित्रपटात राणी मुखर्जीने वठविलेल्या भूमिकेसाठी तब्बूला विचारणा करण्यात आली होती. मात्र तब्बूने नकार दिला होता. तिच्या नकारानंतर ही भूमिका राणीच्या पदरात पडल्याचं सांगण्यात येतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2019 5:41 pm

Web Title: these five actresses rejected karan johar blockbuster movie kuch kuch hota hai offer ssv 92
Next Stories
1 अनुष्काच्या घरी आली छोटी पाहुणी
2 पुस्तकाच्या सहाय्याने तयार केले ‘स्ये रा नरसिम्हा रेड्डी’चे ४२ सेट
3 ”जितनी इज्जत कमाई है, वो सब निकल जाएगी”; अक्षयने का व्यक्त केली भीती?
Just Now!
X