सोशल मीडियावर एखादी गोष्ट व्हायरल होण्यास फार वेळ लागत नाही. मग ते एखाद्या चित्रपटाच्या बाबतीत असो किंवा कलाकाराविषयी. अनुष्का शर्मा आणि वरुण धवन यांची मुख्य भूमिका असलेल्या आगामी ‘सुई धागा’ या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. पण या ट्रेलरची जितकी चर्चा झाली नाही, त्याहून अधिक चर्चा अनुष्काच्या गमतीशीर मीम्सची होत आहे.

ट्रेलरमधील अनुष्काच्या हावभावांचे भन्नाट मीम्स नेटकऱ्यांनी शेअर केले आहेत. त्यापैकी गालावर हात ठेवून कसला तरी विचार करत असलेल्या अनुष्काचा फोटो वापरून जे मीम्स तयार गेले आहेत, ते पाहून तुम्हीही पोट धरून हसाल. फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटरवर सध्या याच मीम्सचा बोलबाला आहे.

https://www.instagram.com/p/Bmutr_yDP8y/

https://www.instagram.com/p/BmsQz3SgsGo/

https://www.instagram.com/p/BmsR_sPge5e/

https://www.instagram.com/p/BmsR1gkgRx6/

Sacred Games: रोममध्येही होतेय गायतोंडेची चर्चा

अनुष्का पहिल्यांदाच ग्लॅमरशिवाय अत्यंत साध्या रुपात या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. मात्र, डी- ग्लॅम अवतारातील ट्रेलरमधील तिचे काही हावभाव नेटकऱ्यांसाठी हास्यास्पद ठरले आहेत. याचेच गमतीशीर मीम्स सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.