जवळपास गेल्या तीन महिन्यांपासून बंद असलेले शूटिंग हळूहळू पुन्हा सुरू होऊ लागले आहेत. सरकारच्या नियमांचं पालन करत अनेक मालिकांनी त्यांच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. मराठीसोबतच हिंदी मालिकांनीही विविध शहरांत कामाला सुरुवात केली आहे.

कलर्स वाहिनीवरील ‘शक्ती अस्तित्व के एहसास की’, ‘छोटी सरदारनी’, ‘बॅरिस्टर बाबू’, ‘शुभारंभ’, ‘नाटी पिंकी की लंबी लव्ह स्टोरी’ आणि अँड टीव्ही वाहिनीवरील ‘एक महानायक डॉक्टर बी. आर. आंबेडकर’, ‘संतोषी माँ सुनाए विराट कथाएं’ या मालिकांची शूटिंग मुंबईतल्या फिल्म सिटीमध्ये आणि मुंबई बाहेरील नायगाव परिसरात सुरु झाली आहे. नव्याने अटीशर्तींचं पालन करत शूटिंग करणं हे कलाकारांसाठी आणि दिग्दर्शकांसाठीही आव्हानात्मक ठरतंय.

शशी मित्तल यांच्या माहितीनुसार सेटवर फक्त ३० जण काम करत आहेत. तर कलाकार वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करत आहेत. सेटवरील सर्वांना सुरक्षा किट देण्यात आली आहे. स्टार प्लस वाहिनीवरील ‘ये रिश्ता क्या कहलाता है’, ‘कसौटी जिंदगी की’, ‘ये रिश्ते है प्यार के’, ‘ये है चाहतें’ या मालिकांचीही शूटिंग सुरू झाली आहे. तर झी टीव्हीवरील ‘कुंडली भाग्य’ आणि ‘कुमकुम भाग्य’ या मालिकांच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे.

निर्माती एकता कपूरनेही तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मालिकांच्या शूटिंगच्या तयारीचा एक फोटो पोस्ट केला आहे. तीन महिन्यांनंतर पुन्हा काम सुरू करता आल्यामुळे कलाकारांसह निर्माते आणि क्रू मेंबर्ससुद्धा आनंदित आहेत.