08 December 2019

News Flash

Sacred Games 2: दुसरा सिझन प्रदर्शित होताच सोशल मीडियावर मीम्सचा पूर

पहिला सिझन जिथे संपतो तिथूनच दुसऱ्या सिझनची कथा सुरू होते.

गेल्या काही महिन्यांपासून प्रेक्षकांना ज्या वेब सीरिजची प्रचंड उत्सुकता होती, ती ‘सेक्रेड गेम्स २’ १५ ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे. मध्यरात्री १२ वाजता ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली. त्यानंतर सोशल मीडियावर त्याचीच जोरदार चर्चा होऊ लागली आहे. इतकंच नव्हे तर या सिझनवरील भन्नाट मीम्ससुद्धा व्हायरल होऊ लागले आहेत.

या सिझनमध्ये गणेश गायतोंडे परदेशात लपून बसला आहे आणि ड्यूटीवरून निलंबित केलेला सरताज सिंग त्याचा शोध घेत आहे. पहिल्या सिझनमध्ये अवघ्या पाच सेकंदांसाठी आलेली जोजो मॅक्सरहन्स या सिझनमध्ये गायतोंडेच्या जीवनातील महत्त्वाची भूमिका साकारत आहे.

पाहा मीम्स-

दुसऱ्या सिझनचे दिग्दर्शन अनुराग कश्यप व ‘मसान’ चित्रपटाचे दिग्दर्शक नीरज घायवान यांनी केले आहे. पहिला सिझन जिथे संपतो तिथूनच दुसऱ्या सिझनची कथा सुरू होते. या सिझनचीही कथा प्रेक्षकाला गुंतवून ठेवते.

First Published on August 15, 2019 9:34 am

Web Title: these memes on sacred games 2 starring saif ali khan nawazuddin siddiqui that will crack you up ssv 92
टॅग Sacred Games 2
Just Now!
X