News Flash

Sarabhai vs Sarabhai Take 2 : … या तारखेला सुरु होणार साराभाई कुटुंबाची ‘क्लिन कॉमेडी’

अतरंगी कुटुंबातील सतरंगी पात्र येणार तुमच्या भेटीला..

साराभाई व्हर्सेस साराभाई

मे महिन्याची सुट्टी लागल्यावर काय करायचे हाच प्रश्न अनेकांना पडतो. मग या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आणि सुट्टीचा पुरेपूर आनंद घेण्यासाठी बऱ्याच शकला लढवल्या जातात. वेळ पडल्यास या शकला लढवण्यासाठी मदतही घेतली जाते. पण, यंदाच्या सुट्टीत असं काहीच करण्याची गरज नाहीये. कारण, सर्वांचं लाडकं ‘साराभाई’ कुटुंब पुन्हा तुमच्या भेटीला आलं आहे. यंदाच्या सुट्टीमध्ये तुमच्या मनोरंजनाची जबाबदारी या अतरंगी कुटुंबाच्या सतरंगी सदस्यांनी घेतली आहे. काही दिवसांपूर्वीच ‘साराभाई’ कुटुंबाची एक झलक असणारा व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आला होता. आता तर हे कुटुंब कधी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे याची तारीख निश्चित झाल्याचं सांगत आणखी एक व्हिडिओ ‘हॉटस्टार’च्या फेसबुक पेजवर प्रदर्शित करण्यात आला आहे.

मे महिन्याच्या १६ तारखेपासून ‘हॉटस्टार’वर ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ ही मालिका नव्या जोमाने सुरु होणार आहे. याविषयीची माहिती देत ‘क्लिन कॉमेडी’ या टॅगलाइनअंतर्गत साराभाईचा हा नवा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला. या व्हिडिओमध्ये ‘साराभाई…’ मालिकेतील इंद्रवदन साराभाई, माया साराभाई, रोसेश साराभाई ही धमाल पात्र दिसत आहेत. मुख्य म्हणजे या सर्व कलाकारांची प्रासंगिक विनोदी शैली आणि सासू-सुनेमध्ये उडणारे खटके पाहिले की ‘या कधीही बदलणार नाहीत….’ असंच म्हणावंसं वाटतं.

११ वर्षांनंतर प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या या मालिकेमध्ये सात वर्षांचा लीप दाखवण्यात येणार आहे. या सात वर्षांमध्ये ‘साराभाई’ कुटुंब आणि त्यातील सदस्यांमध्ये नेमके कोणते बदल झाले हे मालिका सुरु झाल्यावरच कळणार आहे. साराभाई व्हर्सेस साराभाई या मालिकेला मिळालेल्या लोकप्रियतेविषयी सांगायचं झालं तर हलक्या फुलक्या विनोदी अंदाजात या मालिकेचं कथानक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात आलं होतं. सासू-सुनेचं रडगाणं, तोच कावेबाजपणा, प्रेम, सूडबुद्धी आणि फॅमिली ड्रामा यांमध्ये गुंतलेल्या नेहमीच्या मालिकांपेक्षा साराभाई पूर्णपणे वेगळी असल्यामुळेच या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं होतं. मुख्य म्हणजे ही मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे जाहीर झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2017 11:52 am

Web Title: they are back sarabhai vs sarabhai take 2 promo crazy family set to return on may 16 watch video
Next Stories
1 PHOTOS: ‘क्वांटिको गर्ल’ची ही वेशभूषा ठरतेय चर्चेचा विषय..
2 Baahubali 2 ‘.. तेव्हा प्रभासकडे पैसे नव्हते’
3 शाहरुखला मात देण्यात प्रभास अयशस्वी!
Just Now!
X