11 July 2020

News Flash

‘थर्ड आय’चे उद्घाटन संस्कृत सिनेमाने

ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे.

एशियन फिल्म फाऊण्डेशन आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने १४ व्या ‘थर्ड आय’ आशियाई चित्रपट महोत्सवाला २४ डिसेंबरपासून प्रारंभ होत असून प्रथमच महोत्सवाचे उद्घाटन ‘प्रियामानसम’ या विनोद मंकारा दिग्दर्शित संस्कृत सिनेमाने केले जाणार आहे. उद्घाटन समारंभात हिंदी चित्रपटसृष्टीतील वैशिष्टय़पूर्ण योगदानाबद्दल सवरेत्कृष्ट अभिनेत्रीचा विशेष पुरस्कार देऊन ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांना गौरविण्यात येणार आहे. १४ व्या ‘थर्ड आय’ महोत्सवाचे उद्घाटन प्रभादेवीच्या रवींद्र नाटय़ मंदिरमध्ये गुरुवार, २४ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते केले जाणार असून वहिदा रहमान यांना ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे.

सत्यजित राय यांच्या ‘पाथेर पांचाली’ या सिनेमाला ६० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सत्यजित राय लिखित दूरदर्शन मालिकेचे पाच भाग दाखविण्यात येणार असून अशा प्रकारे प्रथमच ‘थर्ड आय’मध्ये चित्रपटाऐवजी मालिकेचे भाग दाखविण्यात येतील. ३१ डिसेंबपर्यंत चालणाऱ्या सात दिवसांच्या महोत्सवात विविध आशियाई देशांतील चित्रपट दाखविण्यात येणार आहेत.
यंदाच्या वैशिष्टय़ांमध्ये ‘अस्तु’ चित्रपटातील भूमिकेसाठी उत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाल्याबद्दल ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांचा सत्कार केला जाणार आहे. तसेच यंदाचा सत्यजित राय स्मृती पुरस्कार कोल्हापूरच्या बाबूराव पेंटर फिल्म सोसायटीचे कार्यकर्ते दिलीप बापट यांना फिल्म सोसायटी चळवळीतील योगदानाबद्दल प्रदान केला जाणार आहे. ‘थर्ड आय’ महोत्सवाची प्रतिनिधी नोंदणी १४ डिसेंबरपासून रवींद्र नाटय़ मंदिर येथे दुपारी २ ते रात्री ८ या वेळेत सुरू होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 13, 2015 12:03 am

Web Title: third eye starts with cultural cinema
Next Stories
1 चेन्नई पूरग्रस्तांना कमल हासन यांची १५ लाखाची मदत
2 बॉलीवूड ‘शहेनशहा’चा ‘नटसम्राट’ला सलाम!
3 दिलीप कुमार यांना पद्म विभूषण पुरस्कार
Just Now!
X