03 March 2021

News Flash

नव्वदच्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रीची ‘भुलभुलैय्या’मध्ये एण्ट्री

खुद्द कियाराने ट्विट करत ही माहिती दिली आहे

एखाद्या प्रसिद्ध चित्रपटाचा सीक्वेल येणे ही गोष्ट बॉलिवूडला नवीन नाही. १९७८ च्या ‘पती पत्नी और वो’ या चित्रपटाचा सीक्वेल निर्मिती चालू असताना निर्माता भूषण कुमार आता २००७ सालच्या ‘भुलभुलैय्या’ या सुपरहिट चित्रपटाचा सीक्वेल करणार असल्याचे समोर आले आहे. या चित्रपटात अभिनेता कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत दिसणार असून त्याच्यासोबत अभिनेत्री कियारी अडवाणी स्क्रिन शेअर करणार आहे. आता या चित्रपटात आणखी एका अभिनेत्रीची एण्ट्री झाली आहे.

खुद्द कियाराने ट्विट करत ही माहिती दिली आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून तब्बू आहे. कियाराने तब्बूचा फोटो शेअर करत ‘मी तब्बूसोबत भुलभुलैय्या चित्रपटाचे शूट करण्यासाठी फार उत्सुक आहे’ असे कॅप्शन दिले आहे. तब्बूची ‘भुलभुलैय्या’मधील एण्ट्री हा चाहत्यांसाठी सुखद धक्काच आहे.

प्रियदर्शन यांनी दिग्दर्शित केलेला ‘भुलभुलैय्या’ हा मुळात २००५चा तमिळ चित्रपट ‘चंद्रमुखी’चा रिमेक आहे. चंद्रमुखी हा चित्रपटदेखील १९९३ च्या ‘मणीचित्रथाझु’ या मल्याळम चित्रपटाचा रिमेक आहे. अक्षय कुमार, विद्या बालन आणि शाइनी अहुजा यांच्या अभिनयामुळे आणि चित्रपटातील गाण्यांमुळे ‘भुलभुलैय्या’ सुपरहिट ठरला होता. आता चाहत्यांना ‘भुलभुलैय्या’च्या सिक्वेलसाठी उत्सुक आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 14, 2019 6:50 pm

Web Title: this 90s actress going to play role in bhool bhulaiya 2 avb 95
Next Stories
1 ‘तानाजी’ चित्रपटातील लूक समोर येताच सैफ झाला ट्रोल
2 Video : चाहतीने प्रभासच्या कानशिलात लगावली, जाणून घ्या सविस्तर
3 फोटोत दिसणारी ‘ही’ चिमुकली आज गाजवते बॉलिवूडवर राज्य
Just Now!
X