News Flash

अनुष्का शर्माच्या भावाला लग्नाचे आमंत्रणच नव्हते!

नकुल मेहताचा किस्सा सध्या अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.

टेलिव्हिजन अभिनेता नकुल मेहता, विराट- अनुष्का

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचे लग्न चर्चेचा विषय आहे. या दोघांनी आपल्या लग्नाची घोषणा केल्यानंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा पाऊस पडला. याशिवाय, या लग्नावरून सोशल मीडियावर अनेक मीम्स आणि जोक्सही व्हायरल झाले. यापैकी टेलिव्हिजन अभिनेता नकुल मेहताचा किस्सा सध्या अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. नकुलने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून बॉलिवूड सेलिब्रिटीविषयीचे एक आर्टिकल शेअर केले आहे. या आर्टिकलमध्ये नकुल मेहता आणि अनुष्का शर्मा एकमेकांचे भाऊ-बहीण असल्याचे म्हटले आहे. हे आर्टिकल पाहून नकुल मेहताही काही वेळासाठी चक्रावून गेला. मात्र, त्यानंतर नकुलने मजेचा भाग म्हणून हे आर्टिकल ट्विटरवर शेअर केले.

या ट्विटमधील संदेशात त्याने म्हटले आहे की, ‘मी अनुष्का शर्माचा भाऊ असल्याची गोष्ट मला जेव्हापासून कळाली, तेव्हापासून मला विराट-अनुष्काला त्यांच्या लग्नाच्या शुभेच्छा देण्याची इच्छा होत आहे.’

वाचा : झायराच्या ‘त्या’ व्हिडिओवर राखीने उपस्थित केला प्रश्न

काही दिवसांपूर्वीच विराट आणि अनुष्काने इटलीमध्ये अत्यंत गुप्त पद्धतीने लग्नसोहळा उरकला होता. या सोहळ्याला केवळ दोघांच्या घरचे नातेवाईकच उपस्थित होते. त्यामुळे नकुल मेहता आमंत्रितांच्या यादीत असणे शक्यच नव्हते. मात्र, तरीही नकुलने गंमतीचा भाग म्हणून हे आर्टिकल सोशल मीडियावर शेअर केले. मात्र, बातमीदाराने आर्टिकल लिहिताना अधिक काळजी घ्यायला हवी होती, असेही त्याने सांगितले. मी खरोखरच अनुष्काचा भाऊ असतो तर मी टस्कनीला नक्कीच गेलो असतो, असा टोला नकुलने लगावला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2017 4:44 pm

Web Title: this actor just discovered that anushka sharma is his sister and he didnt get wedding invitation
Next Stories
1 प्रिया-अभयचे ‘तू, मी आणि गच्ची..’ गाणे
2 अनुष्का शर्माने शेअर केला हनिमूनचा पहिला फोटो
3 महेश काळे आणि तौफीक कुरेशी यांची जुगलबंदी!
Just Now!
X