09 August 2020

News Flash

‘हा’ ठरला महाराष्ट्राचा फेव्हरेट स्टाईल आयकॉन

हा महाराष्ट्राचा लाडका अभिनेता आहे.

अंकुश चौधरी

प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणाऱ्या कलाकारांचा आणि तंत्रज्ञांचा गौरव करणारा सोहळा म्हणजे महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? हा पुरस्कार. वर्षांकाठी येणाऱ्या विविध मराठी चित्रपटांपैकी आपल्या पसंतीचे चित्रपट, कलाकार निवडण्याची संधी प्रेक्षकांना देणारा हा सन्मान सोहळा प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरला. रसिक प्रेक्षकांना आपल्या मतांचा कौल देता यावा या हेतूने झी टॉकीज महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? हा आगळावेगळा सन्मान सोहळा गेल्या दहा वर्षांपासून आयोजित करत असून यंदा सोहळ्याचे अकरावे वर्ष आहे.

यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्राचा फेव्हरेट स्टाईल आयकॉन ठरला अभिनेता अंकुश चौधरी. २०१५ मध्येही त्याने हा पुरस्कार पटकावला होता. तर गेल्या वर्षी तो महाराष्ट्राचा फेव्हरेट अभिनेता ठरला होता. महाराष्ट्राची लोकधारा आणि एकांकिकांमधून आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या अंकुशने क्लासमेट्स, डबल सीट आणि दगडी चाळ या सुपरहिट चित्रपटात आपल्या उत्कृष्ट अभिनयाने रसिकांचे मन जिंकले. प्रेक्षक व समीक्षकांनी केलेलं कौतुक आणि अभिनयातील कुशलपणा यामुळे अंकुशने मराठी चित्रपट सृष्टीमध्ये आपले एक घट्ट स्थान निर्माण केलेलं आहे.

अंकुशने पुरस्कारासोबतचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. लवकरच तो ‘दगडी चाळ २’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 6, 2019 4:35 pm

Web Title: this actor won maharashtracha favourite style icon award 2019 ssv 92
Next Stories
1 ‘माझ्या चित्रपटात काम करशील का?’ वडिलांच्या प्रश्नावर श्रिया पिळगांवकरचं थक्क करणारं उत्तर
2 हैदराबाद एन्काऊंटनंतर तापसी म्हणाली..
3 Teaser : धम्माल विनोदाचा ‘आटपाडी नाईट्स’
Just Now!
X