News Flash

एमएमएस लिक झाल्याने नैराश्यात गेली होती ही अभिनेत्री

ही अभिनेत्री २०१३ मध्ये प्रदर्शित झोलेल्या मालिकेतून प्रकाश झोतात आली होती

छोट्या पडद्यावरील ‘जस्सी जैसी कोई नही’ या मालिकेतून प्रकाश झोतात आलेली अभिनेत्री म्हणजे मोना सिंग. या मालिकेतून मोनाने तिच्या अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली होती. तिने मालिका आणि रिअ‍ॅलिटी शोजचे सूत्रसंचलन अशा दोन्ही गोष्टींचा समतोल साधत आजवरची वाटचाल केली आहे. आज ८ ऑक्टोबर रोजी मोनाचा वाढदिवस आहे. १९८१ मध्ये मोनाचा जन्म पुण्यात झाला. मोनाने ‘जस्सी जैसी कोई नही’ या मालिकेत भूमिका साकारत प्रेक्षकांचा मनावर जादू केली होती. या मालिकेमुळे मोना टीव्ही विश्वासातील एक लोकप्रिय अभिनेत्री ठरली. नंतर तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर येऊ लागल्या होत्या. ‘थ्री इडियट्स’, ‘झेड प्लस’ आणि ‘उटपटांग’ या चित्रपटांमध्ये मोनाने काम केले आहे.

२०१३ मध्ये मोनाचा एक अश्लिल एमएमएस सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये मोना विवस्त्र अवस्थेत असल्याचा दावा करण्यात आला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. मात्र हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ती नैराश्यामध्ये गेल्याच्या चर्चा सुरु होत्या. काही दिवसांमध्येच मोनाने हा व्हिडीओ फेक असल्याचा म्हटले होते. कुणाच्या तरी शरीरावर माझा फोटो चिटकवून माझी प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे तिने म्हटले होते.

आणखी वाचा : राखीच्या बोल्ड सीन देण्यावर पती म्हणतो…

काही दिवसांपूर्वी मोना विवाह बंधनात अडकणार असल्याचे म्हटले जात होते. या तरुणाविषयी अद्याप अधिक माहिती समोर आली नसून हे दोघे गेल्या वर्षभरापासून एकमेकांना डेट करत असल्याचे कळतय. याआधी मोना ‘बँड ऑफ बॉइज’ फेम अभिनेता करण ओबेरॉयला डेट करत होती. करणशी ब्रेकअप झाल्यानंतर बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवालशीही तिचे नाव जोडले गेले होते.

२०१३ मध्ये सोनी टीव्हीवरील एकता कपूरच्या ‘क्या हुआ तेरा वादा’ या मालिकेत मोनाने मुख्य भूमिका साकारली होती. ‘पती, पत्नी और वो’ या नेहमीच्या पठडेबाज शैलीतील या मालिकेतही मोनाचेच पारडे जड होते. त्या मालिकेनंतर मध्यंतरीच्या काळात तिने ‘एंटरटेन्मेंट के लिए कुछ भी करेगा’ या शोसाठी सूत्रसंचालनही केले आणि ‘झेड प्लस’ हा चित्रपटही केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2019 2:03 pm

Web Title: this actress get in depression because of mmn avb 95
Next Stories
1 कॅमेरामन व धावपटूंची ‘अनोखी’ शर्यत, बीग बींनी शेअर केलेला हा व्हिडीओ पहाच
2 गरोदर असल्यामुळे ‘या’ अभिनेत्रीला सोडावे लागले बिग बॉसचे घर
3 राखीच्या बोल्ड सीन देण्यावर पती म्हणतो…
Just Now!
X