27 October 2020

News Flash

या अभिनेत्रीने वयाच्या ५२ व्या वर्षी केलं पाचव्यांदा लग्न

'बिग बॉस'मध्ये लावली होती हजेरी, घेतलं होतं सर्वाधिक मानधन

‘बेवॉच’ फेम अभिनेत्री पामेला अँडरसन पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकली आहे. वयाच्या ५२व्या वर्षी तिने पांचव्यांदा लग्नगाठ बांधली आहे. बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर पामेला आणि ‘बॅटमॅन’ चित्रपटाचा निर्माता जॉन पीटर्स यांनी लग्न केलं. मालिबू बीच याठिकाणी छोटेखानी समारंभात हा विवाहसोहळा पार पडला. पामेला ‘बिग बॉस’ या लोकप्रिय रिअॅलिटी शोच्या चौथ्या सिझनमध्ये झळकली होती. या रिअॅलिटी शोमध्ये हजेरी लावण्यासाठी तिने सर्वाधिक मानधन घेतलं होतं.

लग्नानंतर पामेलाने सोशल मीडियावर जॉन पीटर्ससाठी एक कविता लिहिली. या कवितेत तिने जॉनचा उल्लेख ‘द ओरिजिनल बॅड बॉय ऑफ द हॉलिवूड’ असा केला आहे. याआधी पामेलाने टॉमी ली आणि किड रॉक यांच्याशी लग्न केलं होतं. त्यानंतर पोकर खेळाडू रिक सॅलोमॉन याच्याशी तिने दोनदा लग्नगाठ बांधली होती. फ्रेंच सॉकर स्टार आदिल रामी याच्याशी पामेलाचं अफेअर असल्याच्याही चर्चा होत्या.

आणखी वाचा : राजकीय डेब्यु करणाऱ्या अमित ठाकरेंच्या ‘सौं.’बद्दल तुम्हाला हे माहीत आहे का?

जॉन पीटर्स आणि पामेल यांच्या वयात जवळपास वीस वर्षांचं अंतर आहे. निर्माता होण्याआधी जॉनने हेअर स्टायलिस्ट म्हणून काम केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2020 3:53 pm

Web Title: this actress marries for fifth time meet her husband ssv 92
Next Stories
1 अभिनेता की अभिनेत्री? ओळखून दाखवाच…
2 सलमानची ही हिरोईन साकारणार प्रभासच्या आईची भूमिका?
3 रितेशने विचारलं अबरामकडून काय शिकलास? शाहरुखने दिलं ‘हे’ उत्तर
Just Now!
X