अनू मलिकवर केलेले सर्व आरोप खरे असून इंडस्ट्रीतील अनेकांना त्याचा स्वभाव माहित असल्याचं वक्तव्य प्रसिद्ध गायिका अलिशा चिनॉयने केलं आहे. गेल्या काही दिवसांत संगीतकार- गायक अनू मलिक यांच्यावर चार महिलांनी लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केले आहेत. अलिशानेसुद्धा १९९० साली अनू मलिकवर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. #MeToo मोहिमेअंतर्गत ज्या महिला अन्यायाला वाचा फोडत आहे, त्यांना पाठिंबा दर्शवत अलिशाने अनू मलिकवर टीका केली आहे.

लैंगिक शोषणाच्या आरोपांखाली अलिशाने अनू मलिकला १९९० मध्ये कोर्टात खेचलं होतं. काही वर्षांनंतर या प्रकरणावर पडदा पडला आणि अनू मलिक पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये काम करू लागले. प्रसिद्ध गायकांसोबत गाण्याची संधी देण्यासाठी अनू मलिकने किस मागितल्याचा आरोप गायिका श्वेता पंडितने केला. सोना मोहपात्रा, श्वेता पंडित यांच्यानंतर आणखी दोन महिलांनीही त्यांच्यावर आरोप केला.

parenting tips
मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीचा ‘असा’ करा सदुपयोग
baramati mp supriya sule talk regarding anonymous letter on social media
निनावी पत्राबाबत माहिती नाही! सुप्रिया सुळे यांचे स्पष्टीकरण
Womens Health why facial hair growth increase and What is the solution on it
स्त्री आरोग्य : तुमच्या चेहऱ्यावर आहेत त्रासदायक केस?
love triangle nagpur
‘पती, पत्नी और वो…’ प्रेमाच्या त्रिकोणातून दोन संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर; भरोसा सेलने…

‘अनू मलिकबद्दल लिहिलेला आणि सांगण्यात आलेला प्रत्येक शब्द खरा आहे. ज्या महिलांनी अखेर आवाज उठवला त्यांना माझा पाठिंबा आहे. अनू मलिक हा असा सैतान आहे ज्याने जवळच्या व्यक्तींनाही सोडलं नाही. किस मागितल्याचा धक्कादायक प्रकार श्वेता पंडितने सांगितला. श्वेता ही संगीतकार जोडी जतिन- ललित यांची भाची आहे. या इंडस्ट्रीत मलिकसोबत काम करण्यास अनेकजण तयार असतात. म्हणूनच त्याचा हा स्वभाव बदलत नाहीये. निर्माता साजिद नाडियादवाला, दिग्दर्शक साजिद खान, गुलजार, राकेश मेहरा यांना त्याच्या स्वभावाचं सत्य माहित असूनसुद्धा त्याच्यासोबत काम करतात,’ असं ती म्हणाली.

अनू मलिकवर झालेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर त्यांना ‘इंडियन आयडॉल १०’च्या परीक्षकपदावरून हटवण्यात आलं आहे. सोनी एंटरटेन्मेंट टेलिव्हिजनकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.